MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Solapur Rains : सोलापूरला मुसळधार पावसाने झोडपले, ग्रामीण भागात पुरसदृश्य स्थिती निर्माण, घरांमध्ये शिरले पावसाचे पाणी!

Solapur Rains : सोलापूरला मुसळधार पावसाने झोडपले, ग्रामीण भागात पुरसदृश्य स्थिती निर्माण, घरांमध्ये शिरले पावसाचे पाणी!

Solapur Rains : सोलापुरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून पुरस्थितीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागाला देखील पावसाचा जोरदार फटका बसला आहे. नागरिकांच्या घरांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी देखील शिरले आहे. 

2 Min read
Chanda Mandavkar
Published : Sep 11 2025, 09:37 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
सोलापुरात मुसळधार पावसाचा कहर
Image Credit : Asianet News

सोलापुरात मुसळधार पावसाचा कहर

सोलापूर शहर व परिसरात रात्रभर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. या तुफान पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.

26
शहरातील रस्ते जलमय
Image Credit : Asianet News

शहरातील रस्ते जलमय

अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर, जुना विडी घरकुल, मित्रनगर आणि शेळगी या भागांमध्ये पाणी घरात शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. काही घरांमध्ये तब्बल २ ते ३ फूट पाणी घुसल्याचे चित्र दिसले. शहरातील मुख्य रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. विशेषतः सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील पंजवानी मार्केटसमोर पाणी साचल्यामुळे महामार्ग आणि सर्व्हिस रोडवरील प्रवास ठप्प झाला.

Related Articles

Related image1
Pune Mhada Lottery : आज दुपारी 12.30 पासून ऑनलाईन अर्जाला सुरवात, 4186 घरांची भव्य सोडत, पुण्यात घर घेण्याची स्वप्न होणार साकार!
Related image2
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पावसाची पुन्हा एन्ट्री, 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट, सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार!
36
नागरिकांच्या घरात घाण पाणी
Image Credit : Rajesh/x

नागरिकांच्या घरात घाण पाणी

शहरातील २५६ गाळा परिसरात ड्रेनेज चेंबर ओव्हरफ्लो होऊन दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे लोकांना रात्रभर जागून काढावी लागली. महानगरपालिकेचे कर्मचारी तातडीने ड्रेनेज सफाईसाठी उतरले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बसे आणि अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी मित्रनगर-शेळगी भागाची पाहणी केली. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शहरात मागील २४ तासांत ११८.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

46
ग्रामीण भागात पूरसदृश परिस्थिती
Image Credit : X

ग्रामीण भागात पूरसदृश परिस्थिती

सोलापूर शहराबरोबरच अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द, सांगवी बुद्रुक, चपाळगाव आणि चुंगी गावांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. आधीच भरून वाहणारे ओढे-नाले मुसळधार पावसामुळे ओव्हरफ्लो झाले आहेत. यामुळे गावांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

56
बोरी प्रकल्पातून वाढलेला विसर्ग
Image Credit : ANI

बोरी प्रकल्पातून वाढलेला विसर्ग

अक्कलकोट तालुक्यातील बोरी मध्यम प्रकल्पातून सकाळी सहा वाजल्यापासून ४००० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याआधी हा विसर्ग १५०० क्युसेक होता. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदीजवळ न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, पाण्याचा प्रवाह सुरू असताना कोणत्याही पुलावरून जाणे टाळावे, असा इशाराही दिला आहे.

66
शिरवळवाडी तलावाचा सांडवा ओव्हरफ्लो
Image Credit : Asianet News

शिरवळवाडी तलावाचा सांडवा ओव्हरफ्लो

शिरवळवाडी ल.पा. तलावाचा सांडवा ओव्हरफ्लो झाला असून शिरवळ–वागदरी रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. स्थानिक ग्रामपंचायती, पोलीस पाटील व नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Maharashtra : बिबट्यांचे वाढते हल्ले रोखण्यासाठी सरकारची नवी रणनीती; जंगलात सोडल्या जाणार 1 कोटींच्या शेळ्या-बकऱ्या
Recommended image2
Maharashtra Weather Alert : थंडीचा हाहाकार! महाराष्ट्रात बुधवारी कोल्ड वेव्हचं महासंकट! या 11 जिल्ह्यांना 'अलर्ट'
Recommended image3
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! 'जिवंत सातबारा मोहीम' म्हणजे काय? तुमची अडचण कायमची कशी दूर होईल, पाहा!
Recommended image4
नाताळात कन्फर्म तिकीट हवंय? कोकण रेल्वेची खास भेट!, 'या' विशेष गाड्यांचं संपूर्ण वेळापत्रक पाहा!
Recommended image5
नोकरी गेली... कॅन्सरने जीव नको नकोसा केला! पुणे कर्मचाऱ्याचं 'न्याय मिळेपर्यंत' उपोषण; प्रशासनावर मोठी नामुष्की!
Related Stories
Recommended image1
Pune Mhada Lottery : आज दुपारी 12.30 पासून ऑनलाईन अर्जाला सुरवात, 4186 घरांची भव्य सोडत, पुण्यात घर घेण्याची स्वप्न होणार साकार!
Recommended image2
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पावसाची पुन्हा एन्ट्री, 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट, सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved