Pimpri- Chinchwad Traffic Advisory : रमजान ईदनिमित्त चिंचवडगावातील चापेकर चौक परिसरात मोठी गर्दी अपेक्षित असल्याने 21 मार्च रोजी पहाटे 5 ते दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे वळवण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pimpri- Chinchwad Traffic Advisory : पिंपरी-चिंचवडमधील चिंचवडगाव येथे रमजान ईदनिमित्त नमाज पठणासाठी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव एकत्र येणार आहेत. यामुळे संभाव्य गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत. चापेकर चौक येथील ईदगाह मैदान परिसरात काही प्रमुख रस्ते तात्पुरते बंद करण्यात येणार आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

कधी आणि किती वेळ रस्ते बंद?

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मार्च रोजी (चंद्रदर्शनानुसार बदल होऊ शकतो) पहाटे 5 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चापेकर चौक परिसरातील प्रमुख मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहतील. या कालावधीत केवळ रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलासारख्या अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना परवानगी दिली जाईल.

हे मार्ग राहतील बंद

  • मरीआई माता मंदिर ते चापेकर चौक
  • चापेकर चौक ते मरीआई माता मंदिर
  • मोरयानगर ते चापेकर चौक

या सर्व मार्गांवर वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

पर्यायी मार्गांची व्यवस्था

  • वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले आहेत—
  • मरीआई माता मंदिरकडून येणाऱ्यांनी एसकेएफ कंपनीमार्गे अहिंसा चौक किंवा सेव्हन ऑरेंज हॉस्पिटलच्या मागील रस्त्याचा वापर करावा
  • चापेकर चौककडून जाणाऱ्यांनी जुना जकात नाका मार्गे सेव्हन ऑरेंज हॉस्पिटल किंवा अहिंसा चौक गाठावा
  • मोरयानगरकडून येणाऱ्यांनी हनुमान मंदिरमार्गे सेव्हन ऑरेंज हॉस्पिटलचा मार्ग स्वीकारावा

नागरिकांना सहकार्याचे आवाहन

नमाज पठण शांततेत पार पडावे आणि शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांनी हे नियोजन केले आहे. नागरिकांनी या बदलांची दखल घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.