MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पावसाची पुन्हा एन्ट्री, 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट, सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार!

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पावसाची पुन्हा एन्ट्री, 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट, सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार!

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात ११ सप्टेंबर रोजी पावसाची जोरदार एन्ट्री होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा इशारा, १६ जिल्ह्यांना येलो अलर्ट.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Sep 10 2025, 10:19 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
Image Credit : Getty

मुंबई: महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचं चित्र असलं तरी, हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, ११ सप्टेंबर रोजी राज्यात पावसाची जोरदार एन्ट्री होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर १६ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे.

पशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/BoXXYRuwVR

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 10, 2025

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
Image Credit : ANI

कोकण आणि मुंबई परिसरात हलका पाऊस कायम

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

मुंबई: कमाल तापमान – ३१°C, किमान तापमान – २४°C

Related Articles

Related image1
Dasara Melava : शिवतीर्थावर ठरलं! दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-राज ठाकरे युतीची घोषणा?, मैदानावर अखेर ठाकरे गटाचीच मोहोर
Related image2
Pune Bhide Bridge Closed: भिडे पूल आजपासून बंद, पर्यायी मार्ग कोणते?; वाचा सविस्तर माहिती
37
Image Credit : Asianet News

पश्चिम महाराष्ट्रात विजांचा कडकडाट आणि गडगडाटासह पावसाची शक्यता

पुणे, कोल्हापूर येथे ढगांचा गडगडाटासह हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे.

सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे: कमाल तापमान – २९°C, किमान तापमान – २०°C 

47
Image Credit : Getty

मराठवाड्यातही पावसाचा इशारा, ४ जिल्ह्यांना यलो अलर्ट

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

छ. संभाजीनगर: कमाल तापमान – ३०°C, किमान तापमान – २२°C 

57
Image Credit : X

उत्तर महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर (पूर्वीचा अहमदनगर) या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडू शकतो.

नाशिक: कमाल तापमान – २७°C, किमान तापमान – १९°C 

67
Image Credit : Getty

विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांत पावसाची शक्यता कमी असून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

परंतु, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.

नागपूर: कमाल तापमान – ३२°C, किमान तापमान – २४°C 

77
Image Credit : ANI

एकूण हवामान स्थिती, नागरिकांनी सावध राहणं गरजेचं

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १६ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला गेला असून, काही भागांतील तापमानात वाढ देखील नोंदवली गेली आहे. त्यामुळे उकाड्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मराठवाड्याच्या बातम्या
पुण्याच्या बातम्या
कोल्हापूर बातम्या
मुंबई बातम्या
विदर्भातील बातम्या
नाशिक बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Maharashtra Police : दारुड्या नवऱ्याला मागे बसवलं, स्वतः गाडी चालवत पोलिसांनी गरोदर महिलेला रुग्णालयात पोहोचवलं
Recommended image2
Manoj Jarange Patil : जरांगे पाटील ऑडिओ लीक प्रकरणाच्या SIT चौकशीचं शिवसेनेकडून स्वागत
Recommended image3
Tulja Bhavani Temple Viral Video: धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात भाविकांना धक्काबुक्की, संतापजनक व्हिडिओ व्हायरल
Recommended image4
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी चिमुकलीने फोडली पिगी बँक, फडणवीसही भारावले
Recommended image5
Maharashtra MLC Election : विधान परिषदेच्या ५ जागांसाठी मतमोजणी सुरू, महायुती आणि मविआची प्रतिष्ठा पणाला
Related Stories
Recommended image1
Dasara Melava : शिवतीर्थावर ठरलं! दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-राज ठाकरे युतीची घोषणा?, मैदानावर अखेर ठाकरे गटाचीच मोहोर
Recommended image2
Pune Bhide Bridge Closed: भिडे पूल आजपासून बंद, पर्यायी मार्ग कोणते?; वाचा सविस्तर माहिती
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved