MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Pune Mhada Lottery : आज दुपारी 12.30 पासून ऑनलाईन अर्जाला सुरवात, 4186 घरांची भव्य सोडत, पुण्यात घर घेण्याची स्वप्न होणार साकार!

Pune Mhada Lottery : आज दुपारी 12.30 पासून ऑनलाईन अर्जाला सुरवात, 4186 घरांची भव्य सोडत, पुण्यात घर घेण्याची स्वप्न होणार साकार!

पुणेकरांसाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ मोठी संधी घेऊन आले आहे. तब्बल 4,186 घरांच्या भव्य सोडतीची घोषणा करण्यात आली असून यामुळे अनेकांच्या डोळ्यातील घराचे स्वप्न आता साकार होणार आहे.

2 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Sep 11 2025, 09:11 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
वेगवेगळ्या योजनांमध्ये घरे
Image Credit : Asianet News

वेगवेगळ्या योजनांमध्ये घरे

या सोडतीत विविध योजनांमधून घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यात –

  • पंतप्रधान आवास योजना अंतर्गत – 219 घरे
  • म्हाडा गृहनिर्माण योजना – 1683 घरे
  • 15% सामाजिक गृहनिर्माण योजना – 864 घरे
  • 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना – 3322 घरे

यामुळे सर्वसामान्यांपासून मध्यमवर्गीयांपर्यंत अनेकांना आपल्या बजेटमध्ये घर घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

24
अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा
Image Credit : Social Media

अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा

  • 11 सप्टेंबर 2025 – दुपारी 12:30 पासून ऑनलाईन अर्ज व अनामत रक्कम भरण्यास सुरुवात.
  • 31 ऑक्टोबर 2025 – अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत रात्री 11:55, तर ऑनलाईन अनामत भरण्याची वेळ रात्री 11:59 पर्यंत.
  • 1 नोव्हेंबर 2025 – बँक RTGS/NEFT द्वारे पैसे भरणाऱ्यांसाठी शेवटची संधी.
  • 11 नोव्हेंबर 2025 – संध्याकाळी 6 वाजता प्राथमिक यादी जाहीर.
  • 13 नोव्हेंबर 2025 – दावे-हरकती नोंदविण्याची अंतिम वेळ दुपारी 12 पर्यंत.
  • 17 नोव्हेंबर 2025 – अंतिम यादी प्रकाशित होईल.
  • 21 नोव्हेंबर 2025 – दुपारी 12 वाजता सोडत प्रक्रिया पार पडेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता निकाल वेबसाईटवर उपलब्ध होईल.

Related Articles

Related image1
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पावसाची पुन्हा एन्ट्री, 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट, सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार!
Related image2
Traffic Challan Discount : 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत, चालानवर मिळवा 70 टक्क्यांपर्यंत सूट!
34
पूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया
Image Credit : Asianet News

पूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया

या सर्व प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि अर्जदारांना सोय व्हावी यासाठी अर्ज, नोंदणी, रक्कम भरणे ते सोडत काढणे – सगळे टप्पे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे इच्छुकांनी अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती तपासणे आवश्यक आहे. (म्हाडाची वेबसाईट- https://www.mhada.gov.in/en/node/17936)

44
घराचे स्वप्न आता वास्तवात
Image Credit : Asianet News

घराचे स्वप्न आता वास्तवात

पुण्यात घर घेणे अनेकांसाठी स्वप्नवत मानले जाते. महागाई, वाढते दर यामध्ये स्वतःच्या नावावर घर घेणे कठीण वाटत असले तरी या सोडतीतून ते शक्य होऊ शकते. योग्य वेळी अर्ज करून, दिलेल्या वेळापत्रकाचे पालन करणाऱ्या अर्जदारांसाठी ही संधी आयुष्यभरासाठी सोनेरी ठरणार आहे. तर पुणेकरांनो, वेळ वाया न घालवता अर्ज भरा आणि स्वतःच्या घराच्या स्वप्नाकडे एक पाऊल टाका!

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
महाराष्ट्र बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Nagpur Gudhi Padwa 2026 : नागपुरात गुढीपाडवा उत्साहात साजरा; हजारो नागरिकांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी
Recommended image2
Rajasthan Accident : राजस्थानमध्ये भीषण अपघात; पिंपरी-चिंचवडच्या तिघा तरुणांचा मृत्यू, लेह-लडाख ट्रिपवरून परतताना दुर्घटना
Recommended image3
Pimpri- Chinchwad Traffic Advisory : चिंचवडमध्ये ईदनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; चापेकर चौक परिसरात रस्ते बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग
Recommended image4
Maharashtra Weather Update: गुढीपाडव्याच्या आनंदावर अवकाळीचं सावट; महाराष्ट्रातील ३१ जिल्ह्यांना 'हाय अलर्ट', तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?
Recommended image5
शिर्डीच्या साई प्रसादाला युद्धझळा! इराण युद्धाचा मोठा फटका; आशियातील सर्वात मोठ्या किचनमध्ये आता 'हा' बदल
Related Stories
Recommended image1
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पावसाची पुन्हा एन्ट्री, 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट, सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार!
Recommended image2
Traffic Challan Discount : 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत, चालानवर मिळवा 70 टक्क्यांपर्यंत सूट!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved