MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • पुणेकरांनो, उन्हाळी सुट्टीत गावी जाण्याचं टेन्शन मिटलं! ST च्या ४५० जादा गाड्या धावणार; पाहा तुमचे रूट!

पुणेकरांनो, उन्हाळी सुट्टीत गावी जाण्याचं टेन्शन मिटलं! ST च्या ४५० जादा गाड्या धावणार; पाहा तुमचे रूट!

MSRTC extra buses from Pune: उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पुणे विभागातून एसटी महामंडळाने ४५० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला. १५ एप्रिल ते १५ जून दरम्यान या बसेस कोकण, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा, मुंबई या मार्गांवर धावतील. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 19 2026, 04:03 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
पुणेकरांनो, उन्हाळी सुट्टीत गावी जाण्याचं टेन्शन मिटलं!
Image Credit : our own

पुणेकरांनो, उन्हाळी सुट्टीत गावी जाण्याचं टेन्शन मिटलं!

पुणे: कडक उन्हाळा आणि सोबतीला लागलेली शाळा-महाविद्यालयांची सुट्टी म्हटलं की, पुणेकरांची पावलं गावाची वाट धरतात. रेल्वेचं वेटिंग आणि खासगी बसचे अव्वाच्या सव्वा दर यामुळे हैराण होणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने (MSRTC) मोठा दिलासा दिला आहे. पुणे विभागातून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी तब्बल ४५० जादा बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

25
१५ एप्रिल ते १५ जून, प्रवाशांची चंगळ!
Image Credit : social media

१५ एप्रिल ते १५ जून, प्रवाशांची चंगळ!

नोकरी, शिक्षण आणि व्यवसायानिमित्त पुण्यात स्थायिक झालेले लाखो नागरिक उन्हाळ्यात कोकण, कोल्हापूर, सोलापूर अशा विविध ठिकाणी पर्यटनासाठी किंवा गावी जातात. हीच गर्दी लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने १५ एप्रिल ते १५ जून या दोन महिन्यांच्या कालावधीत विशेष नियोजन केले आहे. 

Related Articles

Related image1
Nagpur Gudhi Padwa 2026 : नागपुरात गुढीपाडवा उत्साहात साजरा; हजारो नागरिकांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी
Related image2
मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार साकार! म्हाडाची २,५०० घरांसाठी बंपर लॉटरी; 'या' दिवशी निघणार जाहिरात
35
तुमच्या जवळच्या आगारातून सुटतील या जादा बस
Image Credit : social media

तुमच्या जवळच्या आगारातून सुटतील या जादा बस

पुण्यातील प्रमुख बस स्थानकांवरून खालीलप्रमाणे जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

स्वारगेट आगार: येथून प्रामुख्याने कोल्हापूर, सोलापूर, सांगली, पंढरपूर, दादर, बोरिवली, ठाणे आणि कल्याण या मार्गांवर जादा बसेस धावतील.

शिवाजीनगर (वाकडेवाडी) आगार: छत्रपती संभाजीनगर, नाशिक, लातूर, धुळे, अकोला या लांब पल्ल्याच्या गाड्यांसह भीमाशंकर आणि बोरिवलीसाठी जादा फेऱ्यांचे नियोजन आहे.

पुणे स्टेशन आगार: पुणे-मुंबई (दादर) या मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथे विशेष जादा बसेस उपलब्ध असतील. 

45
यंदा गर्दीचा 'पीक टाईम' बदलणार?
Image Credit : Getty

यंदा गर्दीचा 'पीक टाईम' बदलणार?

साधारणपणे १० ते १२ एप्रिल दरम्यान शाळांच्या परीक्षा संपतात, पण यंदा परीक्षेचे वेळापत्रक थोडे लांबले असून २५ एप्रिलपर्यंत परीक्षा सुरू राहणार आहेत. त्यामुळे यंदा प्रवाशांची खरी झुंबड २५ एप्रिलनंतर बघायला मिळण्याची शक्यता आहे. हेच ओळखून एसटीने आपले वेळापत्रक लवचिक ठेवले आहे. 

55
स्मार्ट टिप
Image Credit : others

स्मार्ट टिप

उन्हाळ्यातील गर्दी टाळण्यासाठी आणि आपला प्रवास सुखकर करण्यासाठी एसटीच्या अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवरून आगाऊ आरक्षण (Online Booking) करण्यास विसरू नका!

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
पुण्याच्या बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Pune : पुण्यात पवार कुटुंबाची तातडीची बैठक; बारामतीतील ‘पवार विरुद्ध पवार’ चर्चांना उधाण
Recommended image2
रिक्षा-टॅक्सी मराठी सक्तीत मोठा बदल? सरकारचा नवा निर्णय घ्या जाणून
Recommended image3
MHADA Pune Lottery 2026 : पुणेकरांसाठी मोठी संधी! म्हाडाच्या ७९२ घरांची सोडत जाहीर; जाणून घ्या संपू्र्ण अर्जप्रक्रिया
Recommended image4
मराठी सक्तीवरून तणाव शिगेला; रिक्षा-टॅक्सी संघटनांसोबत सरकारची निर्णायक बैठक उद्या
Recommended image5
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण’ योजनेतील ई-केवायसीची अंतिम तारीख 30 एप्रिल; 26 लाख महिलांचा लाभ बंद होणार?
Related Stories
Recommended image1
Nagpur Gudhi Padwa 2026 : नागपुरात गुढीपाडवा उत्साहात साजरा; हजारो नागरिकांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी
Recommended image2
मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार साकार! म्हाडाची २,५०० घरांसाठी बंपर लॉटरी; 'या' दिवशी निघणार जाहिरात
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved