सार

विधानसभेच्या अधिवेशनात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी वेळोवेळी केलेल्या वादग्रस्त विधानांवरुन वाद निर्माण झाला. अशातच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन मंगळवारी (27 फेब्रुवारी) विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचे दिसून आले. खरंतर, सत्ताधाऱ्यांनी मनोज जरांगे यांना कोणाचा पाठिंबा आहे याची चौकशी करा अशी मागणी धरुन ठेवली होती. अशातच आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थितीत केला.

आशिष शेलार यांनी विधानसभेच्या अधिवेशनात म्हटले की, "महाराष्ट्र बेचिराख होण्याची भाषा जरांगे यांच्याकडून केली जात आहे. या सर्व प्रकरणात आतापर्यंत सरकारने घेतलेली भुमिका सर्वसमावेशक असावी अशी आमच्या सर्वांची मागणी आहे. पण जरांगे यांच्या कालच्या भाषेवरुन राज्यात कटाची भाषा बोलली जात असल्याचे दिसून आले. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. राज्याला बेचिराख करण्याची भाषा करणाऱ्यांना पाठिंबा दिला जाणार नाही. याशिवाय जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत."

मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार
मनोज जरांगेंनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन आज विधानसभेत गदारोळ निर्माण झाला. अशाच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी (SIT) मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हिंसा किंवा हिंसक वक्तव्यांना लोकशाहीत स्थान नसल्याचेही राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

मनोज जरांगेंची एसआयटी चौकशीवरील प्रतिक्रिया
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे यांनी म्हटले की, "देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत. मला सगळ्यात अधिक फोन तुमचेच आले आहेत. फेस कॉलवक काय-काय बोलणे झाले हे देखील आता उघड करतो."

आणखी वाचा : 

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या अडचणींमध्ये वाढ, बीडमध्ये पोलिसांकडून FIR दाखल

Maratha Reservation : मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जालना येथे एसटी महामंडळाची बस जाळली

Maratha Reservation : "मराठा समाजाला आरक्षण दिलेय, आता आंदोलन करण्याचा हट्ट थांबवावा", देवेंद्र फडवणीस यांचे मनोज जरांगेंना आवाहन