Maratha Reservation : "मराठा समाजाला आरक्षण दिलेय, आता आंदोलन करण्याचा हट्ट थांबवावा", देवेंद्र फडवणीस यांचे मनोज जरांगेंना आवाहन

| Published : Feb 24 2024, 11:21 AM IST / Updated: Feb 24 2024, 11:24 AM IST

Devendra Fadnavis
Maratha Reservation : "मराठा समाजाला आरक्षण दिलेय, आता आंदोलन करण्याचा हट्ट थांबवावा", देवेंद्र फडवणीस यांचे मनोज जरांगेंना आवाहन
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

मराठा आरक्षणसाठी संघर्ष करत असलेल्या मनोज जरांगे यांनी मुंबई उच्च न्यायालयाला म्हटले की, मी शांतपणे आंदोलन करणार आहे. खरंतर, मनोज जरांगेंनी आपल्या वकिलांच्या माध्यमातून हे आश्वासन कोर्टाला दिलेय.

Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याकडून मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन केले जात आहे. मराठ्यांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारकडून करण्यात आला. तरीही मनोज जरांगेंकडून आंदोलन सुरू आहे. यावरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी नागपूरात पत्रकारांशी बातचीत करताना म्हटले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच स्पष्ट केलेय मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजातील आरक्षणाला धक्का लावणार नाहीत. सरकारने ओबीसी आरक्षण कायम ठेवत मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण दिले आहे. यामुळे ओबीसी समाज संतुष्ट असण्यासह मराठा समाजातही आनंदाचे वातावरण आहे. अशातच मनोज जरांगेंनी आपला हट्ट सोडावा."

फडणवीस यांनी पुढे म्हटले की, सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलेय. यामुळे कोणीही अशा प्रकारचे आंदोलन करू नये, जेणेकरुन नागरिकांना त्रास होईल. याशिवाय जरांगे पाटील यांनी आता आपले आंदोलन संपवावे असे आवाहनही फडवणीस यांनी केले आहे.

रास्ता रोको शांततेत करण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे यांनी आंदोलनात थोडा बदल केला आहे. शुक्रवारी (23 फेब्रुवारी) पत्रकारांशी बोलताना म्हटले की, 12 वी च्या परीक्षा पाहता 24 फेब्रुवारीपासून रास्ता रोको आंदोलनच्या वेळेत बदल केला आहे. हे आंदोलन आधी सकाळी 10.30 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत होणार होते. पण आता 11 ते 1 दरम्यान होणार आहे. आंदोलनादरम्यान राज्यभरात रास्ता रोको शांततेत करा असे आवाहन मनोज जरांगेंनी केले आहे. संध्याकाळी रास्ता रोकोचे रुपांतर धरणे आंदोलनात करा असेही जरांगे यांनी म्हटले आहे. रविवारी (25 फेब्रुवारी) महाराष्ट्रातील मराठा बांधवांशी बोलणार असून महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.

शांततेत आंदोलन करण्याचे जरांगेंचे आश्वासन
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगेंनी मुंबई उच्च न्यायालयाला आश्वासन दिले की, आम्ही शांततेत आंदोलन करणार आहोत. पाटील यांनी आपल्या वकिलांच्या माध्यमातून कोर्टाला आश्वासन दिले आहे. हायकोर्टात पाटील यांच्या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. ही याचिका अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तें यांच्याकडून दाखल करण्यात आली आहे.

आणखी वाचा :

शरद पवार यांना निवडणूक आयोगाने दिले 'तुतारी' पक्ष चिन्ह, रायगडावर होणार भव्य लाँचिंग सोहळा

Maratha Reservation : मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर, वाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Rajya Sabha Election 2024 : शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर