शरद पवार भाजपात जाणार...? पक्षाच्या बड्या नेत्याने हसहसत दिले हे उत्तर

| Published : Apr 12 2024, 12:43 PM IST / Updated: Apr 13 2024, 11:28 AM IST

Sharad Pawar

सार

लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. अशातच पक्षाने तिकीट न दिलेले उमेदवार दुसऱ्या पक्षात एण्ट्री करताना दिसून येत आहेत. दुसऱ्या बाजूला अशीही चर्चा होती शरद पवार भाजपात जाणार आहेत. 

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी सध्या राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. अशातच शरद पवार (Sharad Pawar) भाजपात (BJP) जाणार अशा चर्चांना उधाण आले होते. यावरच शरद पवारांच्या गटाचे नेते जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे.

जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, "शरद पवार कधीच भाजपात जाणार नाही. काहींनी शरद पवारांना त्या बाजूने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण पवारांनी त्याला सातत्याने नकार दिला. यामुळेच शरद पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. जर शरद पवारांना भाजपसोबत जायचे होते तर गेले का नाहीत? याशिवाय शरद पवारांना भाजपची विचारसरणी पटत नाही." असेही जयंत पाटलांनी म्हटले आहे. 

प्रफुल्ल पटेलांचा दावा खोटा
अजित पवारांचा (Ajit Pawar) गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शरद पवार भाजपसोबत जाण्यास 50 टक्के तयार होते असा दावा प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी केला. हे सत्य असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. यावरच शरद पवारांच्या गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

शरद पवारांच्या गटाचे प्रवक्ते महेश तापसे यांनी म्हटले की, शरद पवारांनी कधीच भाजपच्या समर्थनाच्या प्रस्तावाला मान्य केले नाही. त्यामुळे प्रफुल्ल पटेलांनी केलेला दावा खोटा आणि चुकीचा आहे. भाजपसोबत जाण्याचा निर्णय अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि हसन मुश्रीफ यांच्यासह अन्य नेत्यांनी घेतला होता. खरंतर, त्यांच्या तो वैयक्तिक निर्णय असल्याचेही महेश तापसे यांनी म्हटले.

काय म्हणाले होते प्रफुल्ल पटेल
प्रफुल्ल पटेल यांनी दावा केला की, अजित पवारांनी ज्यावेळी सरकारमधील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असता शरद पवारही सरकारसोबत जाण्यासाठी 50 टक्के तयार होते. खरंतर, गेल्या वर्षी 2 जुलैला अजित पवारांनी शरद पवारांच्या गटातून एक्झिट केल्याने पक्ष दोन गटात विभागला गेला. त्यावेळी अजित पवारांसह राज्य सरकारमधील आठ मंत्री, भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांचे सरकार स्थापन झाले होते.

आणखी वाचा : 

Lok Sabha Election 2024 : धैर्यशील मोहिते पाटलांचा BJP ला रामराम, राजीनाम्यानंतर शरद पवारांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

वर्ध्यातील भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या सूनेचे परिवारावर गंभीर आरोप, पत्रकार परिषद घेत म्हणाल्या....

सातारा लोकसभेतून कोणाला मिळणार तिकीट? उदयनराजे भोसले यांच्या नावावर भाजप करणार शिक्कामोर्तब

Read more Articles on