Pune Porsche Crash : किडनी आणि ड्रग्ज प्रकरणात आरोपी असूनही अजय तावरेची अधीक्षक पदी नियुक्ती, समोर आलीय ही मोठी अपडेट

| Published : May 30 2024, 10:56 AM IST / Updated: May 30 2024, 11:08 AM IST

dr ajay taware

सार

Pune Porsche Crash : पुणे पोर्श कार दुर्घटनेच्या प्रकरणात ससून रुग्णालयाचे डीन विनायक काळे यांनी आरोपी डॉ. अजय तावरे संदर्भात मोठा खुलासा केला आहे. अशातच डॉ. तावरेच्या समस्या वाढू शकतात.

Pune Porsche Crash : पुणे पोर्श कार दुर्घटनेत एक मोठे अपडेट समोर आले आहे. ससून रुग्णालयाचे डीन विनायक काळे यांनी आरोपी डॉ. अजय तावरे संदर्भात मोठा खुलासा केला आहे. डॉ. विनायक काळे यांनी म्हटले की, किडनी ट्रांसप्लांट आणि ललित पाटिल ड्रग्जच्या प्रकरणात आरोपी असूनही डॉ. तावरेला रुग्णालयाच्या पुन्हा अधीक्षक पदी नियुक्त करण्यात आले होते. 

खरंतर, आमदार टिंगरे (MLA Tingare) यांनी 26 डिसेंबर 2023 रोजी वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र लिहिले होते आणि त्याच वर्षी तावरे यांची वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अधीक्षक पदावर नियुक्तीदरम्यान रुग्णायात अन्य सर्वजण असिस्टेंट प्रोफेसर होते. सीनियॅरिटीच्या हिशोबाने डॉ. तावरे एकमेव प्रोफेसर होते. अशातच तावरे याला फॉरेंसिक मेडिकल विभागाची जबाबदारी देण्यात आली.

याआधी ससून रुग्णालयाच्या डीनने डॉ. श्रीहरि हल्नोर यांना सक्तीची सुट्टी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाला डॉ. तावरेच्या विरोधाक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याव्यतिरिक्त ज्युवेलाइन जस्टिस बोर्डाचे गैर-न्यायिक सदस्य एल.एन. दानवडे यांच्यासंदर्भात चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारद्वारे पाच सदस्यीय एसआयटी (SIT) कमेटीचे गठन करण्यास सांगितले आहे. याच्या अध्यक्षतेची जबाबदारी महिला आणि बाल विकास विभागातील उपायुक्त स्तरातील अधिकारी करणार आहेत.

मित्राच्या दाव्यामुळे अल्पवयीन आरोपीच्या अडचणी वाढणार
पोलिसांच्या सूत्रांनी म्हटले की, अल्पवयीन आरोपी ड्रायव्हरच्या एका मित्राने सांगितले 19 मे ला अल्पवयीन आरोपीच पोर्श कार चालवत होता. यामध्ये दोनजणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय अल्पवयीन आरोपी कार चालवताना दारुच्या नशेत होता. सूत्रांनी इंडिया टुडेसोबत बातचीत करताना म्हटले की, अल्पवयीन आरोपीच्या मित्राची साक्ष पुण्यातील गुन्हे शाखेच्या ऑफिसमध्ये सहा तास चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला. आरोपीच्या मित्राने दावा केला की, त्याने पोर्श कार चालवण्याआधी खूप दारु प्यायली होती. यानंतरच अपघात घडला. खरंतर, आधी विधानात म्हटले होते अल्पवयीन मुलगा नव्हे त्याच्या परिवारातील ड्रायव्हर पोर्श कार चालवत होता.

अल्पवयीन आरोपीचा बचाव करण्याचा प्रयत्न
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले की, पोर्श कार दुर्घटनेचे प्रकरणात अल्पवयीन आरोपी गाडी चालवत नसल्याचा दिखावा करण्यात येत होता. त्याएवजी गाडी परिवाराचा ड्रायव्हर गंगाराम चालवत होता. पोलिसांना दिलेल्या साक्षात गंगारामने म्हटले होते की, "पोर्श कार अल्पवयीन आरोपी नव्हे मी चालवत होतो."

अल्पवयीन आरोपीच्या आजोबांवर ड्रायव्हरला धमकावल्याचा आरोप
अल्पवयीन आरोपीचे आजोबांनाही अटक करण्यात आली आहे. खरंतर, आजोबांनी गंगारामला धमकवण्यासह पोलिसांसमोर मी गाडी चालवत असल्याचे सांगण्यासाठी भाग पाडले होते असा आरोप लावण्यात आला आहे. अल्पवयीन आरोपीला सध्या 14 दिवस बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

आणखी वाचा : 

Pune Porsche Crash Case : आरोपी मुलाला वाचवण्यासाठी बापाचे सर्वोतोपरी प्रयत्न, डिजिटल पुराव्यांसाठी आता AI तंत्रज्ञानाचा वापर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याने जितेंद्र आव्हाडांना अटक करा, राष्ट्रवादीची मागणी