सार
पुण्यातील पोर्शे कार हिट अॅण्ड रन प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होताना दिसून येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी बापाने सर्वोतोपरी प्रयत्न केल्याचे समोर येत आहे. अशातच आर्टिफिशिअल इंटेलिजेंस तंत्रज्ञानाची प्रकरणात मदत घेतली जाणार आहे.
Pune Porsche Crash Case : पुणे पोर्शे कार हिट अॅण्ड रन प्रकरणात मोठे खुलासे झाले आहेत. आरोपीच्या बापाने मुलाला वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुन्यांची चाचणी होण्याआधी बिल्डर विशाल अग्रवालने (Vishal Agarwal) डॉक्टरांना 14 वेळा फोन केला होता. अशातच पोलिसांनी विशाल अग्रवालला देखील अटक केली असून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
शासकीय रुग्णालय ससूनच्या फॉरेंसिंक डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. अजय तावरेने फोनवर आरोपीच्या वडिलांसोबत 14 वेळा संवाद साधला होता. पोलिसांना संशय आहे की, रक्ताचे नमुने बदलण्यासंदर्भातच दोघांमध्ये संवाद झाला असावा. चाचणीसाठी रक्ताने नमूने घेऊन जात असतानाच आरोपीच्या वडिलांनी डॉक्टर तावरेला 14 वेळा फोन केला होता.
दरम्यान, बुधवारी (29 मे) पुणे गुन्हे शाखेने तावरेच्या घरी छापेमारी केली. तावडेला रक्ताचे नमूने बदलण्यासाठी मोठी रक्कम दिल्याचा गुन्हे शाखेला संशय आहे. अशातच प्रकरणात आर्टिफिशिअल इंटेलिजेंस (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. पुणे पोलिसांकडून पोर्शे कार हिट अॅण्ड रन प्रकरणातील संपूर्ण घटना पुन्हा क्रिएट करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजेंसचा वापर करणार आहे. याच्या माध्यमातून डिजिटल पुरावे जमा केले जाणार आहे.
कोणत्या आरोपात तावरेला अटक?
पुणे पोलिसांनी तावरेला आधीच अटक केली आहे. रुग्णालयातील मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. श्रीहरि हल्नोर आणि स्टाफ सदस्य अतुल घाटकांबळेला देखील पोलिसांनी 19 मे ला अटक केली होती. या सर्वांवर अल्पवयीन आरोपीचे नमुने कचऱ्यात फेकून देण्यासह बदलण्याचा आरोप आहे. दरम्यान, विशाल अग्रवालच्या मुलाने 19 मे ला पुण्यातील कल्याणी नगर परिसरात दारुच्या नशेत दोघांना पोर्शे कारने उडवले होते. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.
किती रक्कमेसाठी झाली होती डील?
पोलिसांना असा संशय आहे की, ससून रुग्णालयात पोर्शे कार अपघातात आरोपीच्या रक्ताचे नमूने अन्य व्यक्तीच्या नमून्यांमध्ये बदलण्यासाठी लाच देण्यात आली होती. दरम्यान, ही रक्कम किती होती याबद्दल तपास केला जातोय. याशिवाय प्रकरणात दोषी ठरलेल्या डॉक्टरांना कोण भेटण्यासाठी आले होते यासाठी ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. सध्या तावरेसह अन्य डॉक्टरांना येत्या 30 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आणखी वाचा :
2 तासात 15 कॉल करून अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी डॉक्टरांना आणले दबावात, तपासात नवीन खुलासे आले समोर
Pune Porsched Accident: 'ते दारु आणायला सांगायचे', वॉर्ड बॉयचे डॉ. अजय तावरेवर गंभीर आरोप