2 तासात 15 कॉल करून अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी डॉक्टरांना आणले दबावात, तपासात नवीन खुलासे आले समोर

| Published : May 29 2024, 09:25 AM IST

Pune Porsche Taycan car
2 तासात 15 कॉल करून अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी डॉक्टरांना आणले दबावात, तपासात नवीन खुलासे आले समोर
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

पुणे येथील कल्याणीनगर अपघातातील नवीन खुलासे समोर येत असून रक्ताच्या सॅम्पलमध्ये पैशांच्या बदल्यात बदल करण्यात आल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात ससून रुग्णालयातील अजय तावरे यांना अटक करण्यात आली आहे. 

पुणे येथील कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघाताचे नवीन अपडेट रोज समोर येत आहेत. अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले असल्याचा दावा पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी केला होता. तीन सदस्यीय समितीने ससून रुग्णालयाला भेट दिली असून याबाबतची नवीन अपडेट समोर आली आहे. यामध्ये ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी पैसे घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 

डॉक्टर आणि आरोपीच्या वडिलांमध्ये झाले होते संभाषण - 
आरोपीचे रक्ताचे नमुने घेतल्यानंतर डॉ. अजय तावरे आणि आरोपीचे वडील विशाल अगरवाल यांच्यात संवाद झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या दोघांमध्ये व्हाट्स अँप आणि कॉलवर चौदा वेळा संभाषण झाल्याचे सांगितले आहे. हे फोन कॉल झाल्यानंतर रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यामुळे या दोघांच्यात नेमकं काय संभाषण झाले होते, याचा तपास पोलीस करत आहेत. 

रक्ताच्या नमुन्यात बदल झाल्याचा पोलिसांनी केला दावा - "
रक्ताच्या नमुन्यात बदल करण्यात आला होता, असा दावा यावेळी पोलिसांकडून करण्यात आला होता. हा खुलासा झाल्यानंतर शासकीय रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हलनोर आणि कर्मचारी अतुल घाटकांबळे यांना अटक करण्यात आली आहे. या तिघांवरही पैशांच्या अमिषापोटी रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

अपघात झाल्यानंतर आरोपीच्या कुटुंबियांकडून त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले गेले. त्यामुळे दहा तासानंतर आरोपी तुरुंगाच्या बाहेर आला होता पण लोकप्रतिनिधी आणि सोशल मीडियावरून लोकांनी आवाज उठवल्यामुळे सदर घटना देशभरात पोहचली आणि पोलिसांना कठोर कारवाई करण्यात भाग पाडण्यात आले. 
आणखी वाचा - 
Pune Porsche Accident : तुला पाहिजे तेवढे पैसे घे, मला मारू नकोस, धनिकपुत्राने प्रत्यक्षदर्शींना पैसे केले होते ऑफर
व्हॉट्सॲप ग्रुपवरून करण्यात आलेल्या ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये भावांचे २ कोटींचे नुकसान, त्या वेळी करून बसले चूक आणि...