Viral Video : पुणे येथील रस्त्यांवर स्क्रू फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस, नागरिकांनी दिल्या संतप्त प्रतिक्रिया

| Published : Mar 04 2024, 06:34 PM IST / Updated: Mar 04 2024, 06:39 PM IST

Pune Viral Video

सार

पुणे येथील रस्त्यांवर स्क्रू फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा एक व्हिडीओ देखील स्थानिक नागरिकाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. याशिवाय पुणेकरांनी रस्त्यावर कोणीतरी मुद्दाम स्क्रू फेकल्याने संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Pune Viral Video : पुणे येथील धक्कादायक आणि विचित्र प्रकार जिल्हाधिकारी कार्यालय आणि जुना बाजार चौक येथील रस्त्यांवर वाहनांचे टायर पंक्चर करण्याच्या उद्देशाने 100 च्या आसपास स्क्रू फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिक आणि प्रवाशांच्या वाहतूकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. पुणेकरांनी रस्त्यांवर स्क्रू फेकल्याचा धक्कादायक प्रकार फ्री प्रेस जर्नल सोबत शेअर केला. याशिवाय घटनेचा व्हिडीओही युजर्सकडून शेअर करण्यात आला आहे.

सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दिसतेय की, स्थानिक नागरिक रस्त्यावर फेकण्यात आलेले स्क्रू जमा करत आहेत. याशिवाय व्हिडीओच्या सुरुवातीला एका व्यक्तीच्या हातात खूप स्क्रू जमा केल्याचेही दिसून येत आहे. 

विपुल देखमुख नावाच्या एका स्थानिकाने म्हटले की, कोणीतरी मुद्दाम अशाप्रकारे रस्त्यांवर स्क्रू फेकले आहेत. माझ्या कारचे फ्लॅट टायर्स असून या प्रकारामुळे मला दुरुस्तीचा त्रास सहन करावा लागला. याशिवाय प्रिया सिंग नावाची महिला परिवारासोबत पुणे येथे प्रवास करत होती. तिने या प्रकरावर म्हटले की, "हे अत्यंत बेजबाबदार आणि दुर्भाग्यपूर्ण कृत्य आहे. यामुळे सर्वांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो."

अनिल शर्मा नावाच्या व्यक्तीने संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले की, "मला वाहनाचे नुकसान सहन करावे लागले. या प्रकारामुळे निष्पाप नागरिकांवर काय परिणाम होत असेल याकडे देखील लक्ष दिले पाहिजे." या प्रकरावर आतापर्यंत अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याशिवाय फ्री प्रेस जर्नलकडून बंडगार्डन पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस अधिकारी संदिपान पवार यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

आणखी वाचा : 

Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे निमंत्रण नाकारले, वाचा नक्की काय आहे कारण

"माझ्या कामाची पद्धत पंतप्रधानांशी मिळती जुळती..." अजित पवारांनी खुले पत्र जारी करून सांगितले का सोडली काकांची साथ

BMC Hospital : रडणे थांबवण्यासाठी नवजात बाळाच्या तोंडाला नर्सने चिकटपट्टी लावल्याचे प्रकरण, पोलिसांकडून गुन्हा दाखल