- Home
- Maharashtra
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाशिममध्ये अनावरण (See Photos)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाशिममध्ये अनावरण (See Photos)
- FB
- TW
- Linkdin
वाशिम येथे शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण
वाशिम (Washim) नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे (Shivaji Maharaj Statue) अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते सोमवारी (4 फेब्रुवारी) करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा वाशिममध्ये जयघोष
अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने वाशिमकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. छत्रपती शिवरायांच्या जयघोष शिवप्रेमींकडून केला जात होता.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला राजकीय नेतेमंडळींची उपस्थिती
शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला संभाजीराजे छत्रपती, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार भावना गवळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार ऍड. किरण सरनाईक, माजी मंत्री महादेवराव जानकर, गोपीकिशन बाजोरिया, विभागीय आयुक्त डॅा. निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, पोलीस अधीक्षक अनुज तारे, सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर यांनी सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
मोठ्या प्रमाणात सोहळ्याला शिवप्रेमींची उपस्थिती
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळकरी विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्याद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांचे स्वागत केले. सोहळ्याला स्थानिक नागरिक, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या कामासाठी वाशिम नगरपरिषदेमार्फत 1.25 कोटी खर्च करण्यात आला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा जमिनीपासून 35 फूट उंच आणि अश्वारुढ पुतळा 13 फूट उंच असल्याची माहिती देण्यात आली.
आणखी वाचा :
PM Modi Maharashtra Visit : PM मोदींच्या हस्ते 9 कोटी शेतकरी कुटुंबांना 21 हजार कोटी रुपयांचे वितरण
छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईतील पहिले मंदिर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन