Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडल्याने यंदा आनंदाचा शिधा बंद करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या मोठ्या खर्चामुळे इतर योजनांना फटका बसत असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबईतील खारघर येथील टाटा कॅन्सर रुग्णालयामागे असणाऱ्या अनिकृत खाणींबाबतची बातमी सध्या चर्चेत आहे. या प्रकरणावरुन एनजीटीने राज्य सरकारी संस्थांना नोटीस धाडली आहे.
नवी दिल्ली : सोन्याच्या दरात सध्या मोठी वाढ पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी तणाव, ट्रम्प प्रशासनाच्या नवीन टॅरिफ धोरणामुळे आर्थिक अस्थिरतेचे वातावरण तयार झाले असून त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर होत आहे.
देशभरातील विमानतळांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. गुप्तचर खात्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे हा अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची आणि इतरांची कडक तपासणी करण्यात येत आहे.
प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथील रेव्ह पार्टीत अंमली पदार्थांसह अटक करण्यात आली. त्यांच्यावर हॉटेल 28 वेळा बुक करून अनेक मुलींना बोलावल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे मानवी तस्करीचा संशय व्यक्त होत असून, पोलिस तपास सुरू आहे.
तुकाराम मुंढे हे कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे, बेधडक निर्णय घेणारे आणि जनहितासाठी झटणारे आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या २० वर्षांच्या सेवेत २४ वी बदली करण्यात आली आहे.
एमएसआरटीसी लवकरच राज्य सरकारचे अधिकृत 'छवा राईड' अॅप चालवेल, जे ड्रायव्हर्सना सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह प्रवास देण्याचे वचन देते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना अधिक शो मिळवून देण्यासाठी आणि प्रादेशिक चित्रपटांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारी पातळीवर समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार असल्याचे पवारांनी म्हटले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. डिसेंबर ते जानेवारी दरम्यान महानगर पालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. VV-PAT यंत्रे वापरण्यात येणार नाहीत.
Maharashtra