महाराष्ट्र सरकारने लाडकी माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे, ज्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात अर्ज करणे सुरू केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेर येथे या योजनेबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अर्ज फॉर्म नीट भरावा लागेल.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले. आर्थिक सर्वेक्षणात 13 प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे, ज्यात अर्थव्यवस्थेची स्थिती, आर्थिक व्यवस्थापन, किमती आणि चलनवाढ, विकासाची दृष्टी समावेश आहे.
Maharashtra Rain Updates : कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर्व विदर्भात सोमवारीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Amit Shah on Uddhav Thackeray : पुण्यात महाराष्ट्र भाजपचे अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
Konkan Heavy Rain : रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात सकाळपासून तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमधील अनेक नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजात वाद सुरु आहे, ज्यामध्ये मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांच्यात द्वंद्व दिसून येत आहे. प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना राजकारणात येण्याचे आवाहन केले आहे.
Devendra Fadnavis on Maratha Reservation : महाविकास आघाडीचे सरकार आलं आणि मराठा आरक्षण गेले. त्याला प्रोटेक्ट करण्याकरिता कुठलाही प्रयत्न त्यांनी केला नाही, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.
महाराष्ट्रात सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सत्ताधारी आघाडीने मुख्यमंत्री चेहरा घोषित न करता निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. 288 जागांवर निवडणूक होणार असून, सरकार स्थापन करण्यासाठी 145 जागांची आवश्यकता आहे.
महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकणापासून विदर्भापर्यंत सर्वत्र पाऊस पडत असून सर्व जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याचे आदेश पोलिस प्रमुखांना देण्यात आले आहेत.
Chandrapur Heavy Rain Monsoon Updates : चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. चंद्रपूर-मूल मार्गावर असलेल्या चिचपल्ली गावातील गावतलाव फुटल्याने गावातील अंदाजे 100 ते 150 घरांमध्ये पाणी शिरले आहे.