Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई : राज्यात हवामान पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता असून, अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट यांचा अनुभव राज्यातील अनेक भागांना येण्याची शक्यता आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर
दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा.
उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह जोरदार सरींचा अंदाज.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून, काही ठिकाणी हलक्याशा सरी होण्याची शक्यता.
अलर्ट मिळालेले जिल्हे
कोकण विभाग
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग – काही भागांत मुसळधार पाऊस
रायगड, ठाणे, पालघर, मुंबई – मध्यम पाऊस
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग – यलो अलर्ट
पश्चिम महाराष्ट्र
कोल्हापूर व घाटमाथ्याचा भाग – मुसळधार पावसाची शक्यता
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर – विजांसह जोरदार पाऊस आणि 30-40 किमी/ता वेगाने वारे
या चारही जिल्ह्यांना यलो अलर्ट
उत्तर महाराष्ट्र
नाशिक, अहिल्यानगर – यलो अलर्ट
धुळे, नंदुरबार, जळगाव – हलका ते मध्यम पाऊस
मराठवाडा: जोरदार पावसाचा इशारा
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव – मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता
बीड जिल्हा – काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा
मराठवाड्याच्या सर्व आठ जिल्ह्यांना यलो अलर्ट
विदर्भातही सावधानतेचा इशारा
वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली – यलो अलर्ट
पश्चिम विदर्भात सामान्यतः आकाश ढगाळ राहणार, हलक्या सरी होण्याची शक्यता
घ्या काळजी!
राज्यातील अनेक जिल्ह्यांत हवामान खवळलेलं असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. प्रवास करताना खबरदारी घ्या, जलस्तर वाढू शकतो. शाळा, कार्यालये, नागरिकांनी शक्यतो घरातच राहावं आणि हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष द्यावं.


