Central Railway Special Trains: रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने 18 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर, मडगाव, कोल्हापूर आणि पुणे या मार्गांवर या गाड्या धावणार आहेत.

मुंबई : येणाऱ्या काही दिवसांत रेल्वे प्रवास अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आणि 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे. हे दोन्ही सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरे होतात आणि त्यानिमित्ताने प्रवाशांची संख्या लक्षणीयरीत्या वाढते. ही वाढ लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी एक खास भेट जाहीर केली आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन एकूण 18 विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष गाड्या दोन दिवस धावणार असून प्रवाशांना सणाच्या काळात प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

कोणत्या मार्गांवर धावतील या विशेष गाड्या?

मिळालेल्या माहितीनुसार, खालील मार्गांवर विशेष गाड्या धावतील

CSMT (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) – नागपूर : 6 विशेष गाड्या

LTT (लोकमान्य टिळक टर्मिनस) – मडगाव : 4 गाड्या

CSMT – कोल्हापूर : 2 गाड्या

पुणे – नागपूर : 6 विशेष गाड्या

या गाड्यांची बुकिंग 9 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

विशेष गाड्यांचे क्रमांक

CSMT – नागपूर : 01123, 02139

नागपूर – CSMT : 01124, 02140

CSMT – कोल्हापूर : 01417

कोल्हापूर – नागपूर : 01418

LTT – मडगाव : 01125, 01127

मडगाव – LTT : 01126, 01128

पुणे – नागपूर : 01469, 01439

नागपूर – पुणे : 01470, 01440

गणेशोत्सवासाठीही रेल्वेची भव्य तयारी

कोकणातील सुप्रसिद्ध गणेशोत्सव लक्षात घेता, मध्य रेल्वेने यंदा तब्बल 250 विशेष गणपती ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईसह उपनगरांतील लाखो चाकरमानी दरवर्षी कोकणात जातात. त्यामुळे ही गाड्या त्यांच्यासाठी मोठा दिलासा ठरणार आहेत.

सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने वेळेवर निर्णय घेत प्रवाशांना दिलासा दिला आहे. आता तुमचं फक्त तिकीट बुक करा आणि सणाचा आनंद प्रवासातही घ्या!