- Home
- Maharashtra
- Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 3000 मिळणार की 1500? अदिती तटकरेंनीच दिली माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 3000 मिळणार की 1500? अदिती तटकरेंनीच दिली माहिती
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू झाले आहे. पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली असून, रक्षाबंधनपूर्वी हप्ता मिळणार आहे.

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत मिळणाऱ्या १२ व्या हफ्त्याची प्रतीक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील हजारो महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, याबाबत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला हप्ता खात्यात!
आदिती तटकरे यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेचा हप्ता रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर वितरित केला जाणार आहे. अनेक पात्र महिलांच्या खात्यांमध्ये सन्मान निधी जमा होण्यास सुरुवातही झाली आहे. गेल्या वर्षी याच सणाच्या काळात दोन महिन्यांचा हप्ता एकत्र मिळाल्याने महिलांना थेट ३ हजार रुपयांचा लाभ मिळाला होता. मात्र यंदा केवळ एकच हप्ता म्हणजे १५०० रुपये जमा होणार आहेत.
बोगस लाभार्थ्यांवर कारवाईचे संकेत
योजनेचा अयोग्यपणे लाभ घेणाऱ्यांविरोधात सरकारने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेल्या डेटाच्या आधारे पात्रता तपासणीसाठी पुढील १५ दिवसांत विशेष तपास करण्यात येणार आहे. जर एखाद्या पुरुषाने किंवा अपात्र व्यक्तीने लाभ घेतल्याचे आढळले, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
आदिती तटकरे यांची सोशल मीडिया पोस्ट
ट्विटरवरून तटकरे यांनी सांगितले की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जुलै महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण आजपासून सुरू झाले आहे. आधार लिंक असलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून निधी जमा होईल." त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे मार्गदर्शन आणि लाडक्या बहिणींचा विश्वास या योजनेच्या यशात मोलाचा वाटा असल्याचेही नमूद केले.
12 वा हप्ता जुलै महिन्यासाठी, जुलै 2024 पासून सुरू झालेली योजना
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू झाली असून, याचा १२ वा हप्ता आता वितरित केला जात आहे. जुलै महिन्याच्या सन्मान निधीच्या वितरणाची प्रक्रिया अधिकृतरित्या सुरू झाली आहे, आणि पात्र महिलांच्या खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या १२ व्या हफ्त्याबाबत मोठी अपडेट आली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली असून, रक्षाबंधनपूर्वी हप्ता मिळणार असल्याने बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. बोगस लाभार्थ्यांवर सरकारची करडी नजर आहे आणि लवकरच त्या संदर्भात कारवाईही होणार आहे.

