Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात तांत्रिक अडचणीमुळे विलंब झाला आहे. गिरगाव चौपाटीवर मूर्ती तराफ्यावर बसवताना अडचण निर्माण झाल्याने विसर्जन प्रक्रिया थोडा वेळ स्थगित करण्यात आली.
अनंत चतुर्दशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'देवभाऊ' म्हणून वृत्तपत्रांत आणि विमानतळांवर जाहिराती झळकल्या.
पुण्यातील विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी पर्यंत लांबली असून काही मंडळांनी आज सकाळी पुन्हा मिरवणूक सुरू केली आहे. श्रीमंत भाऊसासेब रंगारी, अखील मंडई, हुतात्मा बाबू गेणू यांच्यासह काही गणपतींचे विसर्जन रात्री उशिराने पार पडले.
Ladki Bahin Yojana: राज्य सरकारच्या ‘माझी लाडकी बहिण’ योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय असून 26.30 लाख महिला लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. अपात्र लाभार्थ्यांना वेगळं करणं आणि योजनेचा अपवापर थांबवणं हा या मोहिमेचा उद्देश आहे.
Devendra Fadnavis Campaign: मराठा आरक्षणाबाबतच्या निर्णयानंतर मुंबई आणि ठाण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 'देवाभाऊ' असे उल्लेख असलेले बॅनर्स झळकले आहेत. भाजपकडून श्रेयवादाची मोहीम सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये 7 सप्टेंबर रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे.
Ganpati Visarjan 2025 : खेड तालुक्यातील वाकी बुद्रूक येथे गणपती विसर्जनादरम्यान दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
MHADA Shops: म्हाडा मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील 149 अनिवासी गाळे (दुकाने) ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करत आहे. मालवणी, मालाड, कोपरी, पवई, चारकोपसह अनेक ठिकाणी ही दुकाने उपलब्ध आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत भाजप आमदार संजय केनेकर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते अंबादास दानवे एकत्र नाचताना दिसले. राजकीय मतभेद विसरून दोघांनीही ढोल ताशांच्या गजरात उत्साहात सहभाग घेतला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले की कोणताही देश भारताच्या परराष्ट्र धोरणात ढवळाढवळ करू शकत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारत-अमेरिका संबंध 'अतिशय विशेष' असल्याचे म्हटले होते.
Maharashtra