MHADA Shops: म्हाडा मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील 149 अनिवासी गाळे (दुकाने) ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करत आहे. मालवणी, मालाड, कोपरी, पवई, चारकोपसह अनेक ठिकाणी ही दुकाने उपलब्ध आहे.

मुंबई : व्यवसाय सुरू करायचा पण जागेचं भाडं परवडत नाही? मुंबईसारख्या महागड्या शहरात दुकानासाठी लागणाऱ्या गाळ्यांचे दर गगनाला भिडलेले असताना, म्हाडा (मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ) तुमच्यासाठी घेऊन आलंय खास संधी! मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील 149 अनिवासी गाळे (शॉप्स/दुकाने) आता ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. या संधीचा फायदा घेण्यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून 16 सप्टेंबर 2025 पर्यंत करण्यात आली आहे.

कोणकोणत्या भागांमध्ये गाळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत?

म्हाडाच्या यादीत खालील ठिकाणांवरील गाळे उपलब्ध आहेत.

मालवणी, मालाड: 46 गाळे

कोपरी, पवई: 23 गाळे

चारकोप: 23 गाळे

बिंबिसार नगर, गोरेगाव पूर्व: 17 गाळे

प्रतीक्षा नगर, सायन: 9 गाळे

महावीर नगर, कांदिवली पश्चिम: 6 गाळे

मुलुंड गव्हाणपाडा: 6 गाळे

जुने मागाठाणे, बोरीवली पूर्व: 6 गाळे

कुर्ला - स्वदेशी मिल: 5 गाळे

अँटॉप हिल, वडाळा: 3 गाळे

शास्त्री नगर, सिद्धार्थ नगर, मजासवाडी - जोगेश्वरी पूर्व: प्रत्येकी 1 गाळा

तुंगा, पवई: 2 गाळे

ई-लिलावासंदर्भातील महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख: 16 सप्टेंबर 2025, रात्री 11:59 पर्यंत

ई-लिलावाची तारीख: 18 सप्टेंबर 2025, सकाळी 11 ते संध्याकाळी 5

निकाल जाहीर होण्याची तारीख: 19 सप्टेंबर 2025, सकाळी 11 वाजता

निकाल पाहण्याची ठिकाणं

https://eauction.mhada.gov.in

https://mhada.gov.in

अर्जदारासाठी आवश्यक अटी

वय: 18 वर्षांपेक्षा जास्त

रहिवासी प्रमाणपत्र: महाराष्ट्र राज्यातील 2018 नंतरचे वैध प्रमाणपत्र आवश्यक

ई-लिलावाची सविस्तर माहिती व अर्ज प्रक्रिया: वर दिलेल्या वेबसाईट्सवर उपलब्ध

जर तुम्हाला मुंबईत घर परवडत नसेल, पण व्यवसायासाठी दुकानाची गरज असेल, तर म्हाडाच्या या संधीचा नक्की फायदा घ्या. गाळे खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी गमावू नका. कारण अशा ऑफर्स वारंवार येत नाहीत!