- Home
- Maharashtra
- छत्रपती संभाजीनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीत राजकीय रंग!, ठाकरे गट आणि भाजप नेत्यांचा जबरदस्त डान्स
छत्रपती संभाजीनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीत राजकीय रंग!, ठाकरे गट आणि भाजप नेत्यांचा जबरदस्त डान्स
छत्रपती संभाजीनगरच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत भाजप आमदार संजय केनेकर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते अंबादास दानवे एकत्र नाचताना दिसले. राजकीय मतभेद विसरून दोघांनीही ढोल ताशांच्या गजरात उत्साहात सहभाग घेतला.

छत्रपती संभाजीनगर : गणपती बाप्पाला निरोप देताना सारा महाराष्ट्र भक्ती आणि उत्साहाने न्हालेला आहे. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक खास दृश्य पाहायला मिळाले. जे राजकीय वर्तुळात सुद्धा चर्चेचा विषय ठरले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत, भाजपचे आमदार संजय केनेकर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) नेते अंबादास दानवे हे दोघंही एकत्र थिरकत असल्याचे दृश्य लक्ष वेधून घेत होते.
राजकीय भेद विसरून भक्तिभावात रंगले दोन्ही नेते
ज्यांना आपण राजकीय विरोधक समजतो, ते दोघं जुने मित्र असून, गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत त्यांनी आपापले मतभेद बाजूला ठेवले आणि ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देताना ठेका धरला. मानाच्या गणपती मिरवणुकीत त्यांच्या या डान्सने उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच नेत्यांनीही निस्सीम श्रद्धेने आणि आनंदाने सहभाग घेतल्याचे दृश्य अनेकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले.
भाजप आणि ठाकरे गटाचा जल्लोष एकाच रस्त्यावर
भाजप आणि ठाकरे गटाचे समर्थक या दृश्याने काहीसे आश्चर्यचकित झाले, मात्र यामुळे एक सकारात्मक संदेश गेला की सण साजरे करताना राजकारण बाजूला ठेवता येते आणि एकोप्याने आनंद साजरा करता येतो.
फोटोमध्ये पाहा, नेत्यांचा ठेका आणि भक्तीचा रंग
या अनोख्या क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काहींनी हे दृश्य "राजकारणाला थोडी विश्रांती" असंही म्हटलं आहे.