MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळ्याचा संशय!, 26 लाखांहून अधिक महिलांची घरोघरी पडताळणी सुरू

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळ्याचा संशय!, 26 लाखांहून अधिक महिलांची घरोघरी पडताळणी सुरू

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारच्या ‘माझी लाडकी बहिण’ योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय असून 26.30 लाख महिला लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. अपात्र लाभार्थ्यांना वेगळं करणं आणि योजनेचा अपवापर थांबवणं हा या मोहिमेचा उद्देश आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Sep 06 2025, 11:34 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
Image Credit : Asianet News

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘माझी लाडकी बहिण’ योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होत असून, 26.30 लाख महिला लाभार्थ्यांची प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी करण्याची मोहीम सरकारने सुरू केली आहे. या मोहिमेचा उद्देश म्हणजे अपात्र लाभार्थ्यांना वेगळं करणं आणि योजनेचा अपवापर थांबवणं.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
Image Credit : Asianet News

काय आढळलं गैरव्यवहारात?

माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्राथमिक विश्लेषणानंतर काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत

एका कुटुंबातील तीन किंवा अधिक महिलांनी नोंदणी केल्याचे आढळले.

वयोमर्यादा ओलांडलेल्या महिलांनाही लाभ मिळाल्याचे दिसले.

काही प्रकरणांमध्ये पुरुषांनीही खोट्या पद्धतीने अर्ज करून लाभ घेतल्याचे उघड झाले!

यामुळे सरकारने राज्यभरात अंगणवाडी सेविकांमार्फत व्यापक पडताळणी मोहिम हाती घेतली आहे.

Related Articles

Related image1
Ladki Bahin Yojana : या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट-सप्टेंबरचा हप्ता, कारण काय?
Related image2
महाराष्ट्रातील पशुपालकांसाठी आनंदाची बातमी, सरकार देणार गायी-म्हशींच्या खरेदीसाठी अनुदान!
36
Image Credit : social media

पडताळणी मोहिमेतील अडचणी

या मोहिमेतील सर्वात मोठी अडचण म्हणजे अस्पष्ट पत्ते. शहरी भागात अनेक लाभार्थ्यांच्या नोंदणीमध्ये केवळ जिल्हा व शहराचे नाव दिले गेले आहे; संपूर्ण पत्ता नसल्याने अस्सल लाभार्थ्यांचा शोध घेणे कठीण बनले आहे.

अनेक ठिकाणी पत्ता चुकीचा आहे

काही घरी लाभार्थी सापडत नाहीत

यामुळे सेविकांचा मोठा वेळ आणि खर्च वाया जातो आहे

दीड महिना उलटूनही प्रक्रिया अपूर्ण

46
Image Credit : social media

पडताळणीचे महत्त्वाचे निकष

सरकारकडून लाभार्थ्यांची पडताळणी खालील बाबींवर केली जात आहे.

वय: 21 ते 65 वर्षांदरम्यान

कुटुंबातील पात्र सदस्यांची संख्या: फक्त दोन महिलांना लाभ

वार्षिक उत्पन्न: 2.5 लाखांपेक्षा कमी

वाहन: कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का?

नोकरी: लाभार्थी महिला सरकारी कर्मचारी तर नाही?

पडताळणी पथक घरभेटी देऊन संपूर्ण माहिती गोळा करत असून, वैवाहिक स्थिती, रोजगार, कुटुंबातील रचना यावरही भर दिला जात आहे.

56
Image Credit : social media

अनेक नियमबाह्य लाभ उघडकीस

पडताळणीदरम्यान आतापर्यंत अनेक अशा प्रकरणांचा उलगडा झाला आहे जिथे अपात्र लाभार्थ्यांना अनधिकृतपणे लाभ दिला गेला आहे. यामुळे योजना चुकीच्या हातात जात असल्याचं स्पष्ट होतं.

66
Image Credit : iSTOCK

‘माझी लाडकी बहिण’ योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्वाची आहे. मात्र, योग्य लाभार्थ्यांपर्यंतच लाभ पोहोचावा यासाठी ही पडताळणी मोहीम अत्यंत गरजेची ठरत आहे. सरकारच्या या कारवाईमुळे येत्या काळात योजना अधिक पारदर्शक व प्रभावी होण्याची अपेक्षा आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Operation Tiger | शिवसेनेचे 4 खासदार मातोश्रीवर उपस्थित, तर 5 ऑनलाईन उपस्थित
Recommended image2
Shivsena MP : 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना बळ; ठाकरेंचे इतके खासदार नॉटरिचेबल?
Recommended image3
SHARAD PAWAR : शरद पवार भाजपसोबत जाणार? रामदास आठवलेंची मोठी ऑफर
Recommended image4
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भुजबळांचे सूचक विधान, वाचून म्हणाल हे कस झालं?
Recommended image5
रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस, तब्येत खालावली
Related Stories
Recommended image1
Ladki Bahin Yojana : या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट-सप्टेंबरचा हप्ता, कारण काय?
Recommended image2
महाराष्ट्रातील पशुपालकांसाठी आनंदाची बातमी, सरकार देणार गायी-म्हशींच्या खरेदीसाठी अनुदान!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved