Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. ज्या महिलांची कागदपत्रे पूर्ण आहेत आणि खाते आधार कार्डशी संलग्न आहे, त्यांनाच हा लाभ मिळेल.
राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर ‘नो पीयूसी, नो फ्युएल’ हा उपक्रम सक्तीने राबवला जाणार आहे. यासाठी सर्व पंपांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. याबाबतची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
Solapur Rains : सोलापुरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून पुरस्थितीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागाला देखील पावसाचा जोरदार फटका बसला आहे. नागरिकांच्या घरांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी देखील शिरले आहे.
पुणेकरांसाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ मोठी संधी घेऊन आले आहे. तब्बल 4,186 घरांच्या भव्य सोडतीची घोषणा करण्यात आली असून यामुळे अनेकांच्या डोळ्यातील घराचे स्वप्न आता साकार होणार आहे.
Pune : पुणे येथे डीजेच्या टॅम्पोने पथकामधील वादकांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी माजी झेडपी अध्यक्षांसह चौघांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात ११ सप्टेंबर रोजी पावसाची जोरदार एन्ट्री होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा इशारा, १६ जिल्ह्यांना येलो अलर्ट.
Bhide Bridge: पुण्यातील डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनजवळील भिडे पूल पादचारी पुलाच्या कामामुळे १० सप्टेंबर २०२५ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. नागरिकांना संभाजी पूल, शिंदे पूल, गाडगीळ पूल या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Maharashtra State Government Jobs: महाराष्ट्र सरकारने राज्यभरात 10 हजार पदांवर अनुकंपा तत्वावर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती चतुर्थ श्रेणीतील विविध रिक्त पदांसाठी असून, 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल.
यंदाच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर ही शक्यता बळावली आहे. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे.
पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रासह जवळपास २० राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे परतीचा पाऊस राज्याला चांगलाच झोडपून काढणार असल्याचे दिसत आहे.
Maharashtra