- Home
- Maharashtra
- Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यावर जमा होणार 'सन्मान निधी', जाणून घ्या पात्रतेचे निकष
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यावर जमा होणार 'सन्मान निधी', जाणून घ्या पात्रतेचे निकष
Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. ज्या महिलांची कागदपत्रे पूर्ण आहेत आणि खाते आधार कार्डशी संलग्न आहे, त्यांनाच हा लाभ मिळेल.

मुंबई: नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी आजपासून खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
आदिती तटकरे यांनी ट्विटरद्वारे माहिती देताना सांगितले की, ज्या महिलांची सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत आणि खाते आधार कार्डशी संलग्न आहे, त्यांच्याच खात्यावर आजपासून रक्कम जमा होईल. त्यामुळे पात्र महिलांना काही अटी पूर्ण केल्यास आर्थिक मदतीचा लाभ सहजपणे मिळणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली… pic.twitter.com/oRnOcQxuzP— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 11, 2025
महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणाची दिशा
'माझी लाडकी बहीण' योजना हे महाराष्ट्र शासनाचे महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. या योजनेने राज्यातील अनेक माता-भगिनींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवले आहे. थेट खात्यावर रक्कम जमा केल्यामुळे योजनेत पारदर्शकता आणि विश्वास वाढलेला दिसून येतो.
तुम्हालाही हप्ता मिळाला नाही?, जाणून घ्या कारणं
जर तुम्हाला अजून हप्त्याचे पैसे मिळाले नसतील, तर यामागे खालील कारणं असू शकतात.
बँक खाते आधारशी संलग्न नसणे
KYC प्रक्रिया पूर्ण न झालेली असणे
इतर सरकारी योजनांचा लाभ घेतलेला असणे
लग्न होऊन इतर राज्यात स्थलांतर झालेले असणे
वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांहून अधिक असणे
सदर माहितीची फेरतपासणी सध्या सुरू असून, आयकर विभाग, RTO आणि इतर शासकीय यंत्रणांकडून डेटा मागवून क्रॉस चेकिंग केली जात आहे. त्यामुळे नियमांनुसार अपात्र महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत.
तपासा तुमची पात्रता
जर तुम्ही पात्र असूनही रक्कम मिळाली नाही, तर ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. काही बाबी सुधारल्यानंतर पुढील महिन्यांपासून तुमचाही हप्ता नियमित मिळू शकतो.

