गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल बोट बुडाली. ८० प्रवाशांपैकी १३ जणांचा मृत्यू झाला असून, ६६ जणांना वाचवण्यात आले आहे. स्पीड बोट धडकल्याने हा अपघात झाल्याचा आरोप आहे.
महाराष्ट्र सरकारमधील मंत्रीपदापासून वंचित राहिलेले छगन भुजबळ नाराज असून त्यांनी येवल्यात कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध, मनोज जरांगेंच्या मागण्यांना विरोध केल्याने मंत्रीपदाच्या आश्वासनाला धक्का बसलाय.
मुंबईच्या मध्य रेल्वेच्या एसी लोकलमधील महिला डब्यात एका नग्न पुरुषाने प्रवेश केल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. सोमवारी संध्याकाळी सीएसएमटी ते कल्याण दरम्यानच्या प्रवासात घाटकोपर स्थानकावर ही घटना घडली.
महाराष्ट्राच्या राजकारणात आदिती तटकरे यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अवघ्या ३६ व्या वर्षी त्या राज्याच्या सर्वात तरुण महिला मंत्री आहेत. त्यांचा राजकीय प्रवास, सामाजिक कार्य आणि वैयक्तिक जीवन जाणून घ्या.