MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • नाताळात कन्फर्म तिकीट हवंय? कोकण रेल्वेची खास भेट!, 'या' विशेष गाड्यांचं संपूर्ण वेळापत्रक पाहा!

नाताळात कन्फर्म तिकीट हवंय? कोकण रेल्वेची खास भेट!, 'या' विशेष गाड्यांचं संपूर्ण वेळापत्रक पाहा!

Konkan Railway Special Trains : नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमधील गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने मुंबई, करमाळी, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरू या मार्गांवर अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Dec 09 2025, 06:14 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
कोकण रेल्वेची विशेष गाड्या धावणार, वेळापत्रक जाहीर
Image Credit : Google

कोकण रेल्वेची विशेष गाड्या धावणार, वेळापत्रक जाहीर

मुंबई : नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमध्ये कोकणासह दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई, करमाळी, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरू या मार्गांवर वाढत्या मागणीमुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात विशेष सेवांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यातील सर्व गाड्यांचे आरक्षण सुरू झाले असून तिकीट मिळण्याची संधीही मोठी आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
मुंबई CSMT–करमाळी दैनिक विशेष (01151 / 01152)
Image Credit : our own

मुंबई CSMT–करमाळी दैनिक विशेष (01151 / 01152)

कोकण–गोवा मार्गावर प्रचंड वाढलेली मागणी पाहून ही विशेष सेवा दररोज चालवली जाणार आहे.

गाडी क्र. 01151 — मुंबई CSMT करमाळी

कालावधी: 19 डिसेंबर ते 5 जानेवारी (दैनिक)

सुटण्याची वेळ: रात्री 12.20

सुटण्याचे ठिकाण: मुंबई CSMT

गंतव्य: करमाळी (गोवा)

गाडी क्र. 01152 — करमाळी → मुंबई CSMT

कालावधी: 19 डिसेंबर ते 5 जानेवारी (दैनिक)

सुटण्याची वेळ: दुपारी 2.15

सुटण्याचे ठिकाण: करमाळी

गंतव्य: मुंबई CSMT

या दोन्ही गाड्यांचे तिकीट PRS केंद्रे, इंटरनेट आणि IRCTC वर उपलब्ध असून सुट्टीतील गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांनी लवकर आरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Related Articles

Related image1
सुपर-फास्ट गुडन्यूज! मुंबई-नाशिक लोकल मार्गाला ग्रीन सिग्नल! रूट कसा असेल?
Related image2
नोकरी गेली... कॅन्सरने जीव नको नकोसा केला! पुणे कर्मचाऱ्याचं 'न्याय मिळेपर्यंत' उपोषण; प्रशासनावर मोठी नामुष्की!
35
एलटीटी–तिरुवनंतपुरम उत्तर साप्ताहिक विशेष (01171 / 01172)
Image Credit : social media

एलटीटी–तिरुवनंतपुरम उत्तर साप्ताहिक विशेष (01171 / 01172)

दक्षिण भारत, विशेषतः केरळकडे जाणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे.

गाडी क्र. 01171 — एलटीटी - तिरुवनंतपुरम उत्तर (गुरुवार)

सुटण्याच्या तारखा:

18 डिसेंबर

25 डिसेंबर

1 जानेवारी

8 जानेवारी

वेळ: दुपारी 4.00

स्थान: एलटीटी, मुंबई

गाडी क्र. 01172 — तिरुवनंतपुरम उत्तर - एलटीटी (शनिवार)

परतीच्या तारखा:

20 डिसेंबर

27 डिसेंबर

3 जानेवारी

10 जानेवारी

वेळ: दुपारी 4.20

स्थान: तिरुवनंतपुरम उत्तर

ही गाडी तिरुवनंतपुरम, कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम यांसारख्या प्रमुख स्थानकांना जोडत असल्याने दक्षिणेकडे जाणाऱ्यांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. 

45
एलटीटी – मंगळुरू जंक्शन साप्ताहिक विशेष
Image Credit : Social Media

एलटीटी – मंगळुरू जंक्शन साप्ताहिक विशेष

नाताळ–नववर्ष काळात कोकण आणि कर्नाटक किनारपट्टीकडे वाढणारी गर्दी पाहून या मार्गावरही अतिरिक्त विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. (पूर्ण वेळापत्रक रेल्वेकडून लवकरच जाहीर होणार.) 

55
आरक्षण सुरू, प्रवाशांना रेल्वेचे आवाहन
Image Credit : Social Media

आरक्षण सुरू, प्रवाशांना रेल्वेचे आवाहन

सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण सुरू झाले असून सुट्टीतील तिकीटटंचाई टाळण्यासाठी प्रवाशांनी लवकरात लवकर संधी साधावी, असा सल्ला रेल्वेकडून देण्यात आला आहे.

नाताळ आणि नववर्षाच्या काळात कोकण रेल्वेवर नेहमीच मोठी गर्दी असते. त्यामुळे या अतिरिक्त गाड्यांमुळे प्रवास अधिक सुरळीत होईल आणि तिकीट मिळण्याची शक्यता अधिक वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Recommended image2
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Recommended image3
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'
Recommended image4
Sangli Waste Plant : प्रदूषणाच्या तक्रारींनंतर सांगलीतील 10 मेगावॅटचा वीज प्रकल्प बंद
Recommended image5
MPSC Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांचा पाठिंबा, सरकारला दिला इशारा
Related Stories
Recommended image1
सुपर-फास्ट गुडन्यूज! मुंबई-नाशिक लोकल मार्गाला ग्रीन सिग्नल! रूट कसा असेल?
Recommended image2
नोकरी गेली... कॅन्सरने जीव नको नकोसा केला! पुणे कर्मचाऱ्याचं 'न्याय मिळेपर्यंत' उपोषण; प्रशासनावर मोठी नामुष्की!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved