- Home
- Maharashtra
- प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!
Central Railway Traffic Block : मध्य रेल्वेने लोणावळा–बीव्हीटी यार्डमधील मार्गविस्ताराच्या कामामुळे ८, १० डिसेंबरला विशेष वाहतूक, पॉवर ब्लॉक जाहीर केला. या कामामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आणि पुणे उपनगरीय लोकल सेवेच्या वेळापत्रकात बदल होणारय.

लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबई : मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा अपडेट जाहीर करण्यात आला आहे. लोणावळा–बीव्हीटी यार्डमधील मार्गविस्ताराच्या कामामुळे आगामी काही दिवस रेल्वे वाहतुकीवर थेट परिणाम होणार आहे. अप-डाउन मार्गांसह अतिरिक्त ट्रॅकसाठी करण्यात येणाऱ्या या कामात प्री नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग अशा दोन टप्प्यांचा समावेश असून, त्यासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आले आहेत.
८ डिसेंबर : चार तासांचा विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक
सकाळी 11.25 ते दुपारी 3.25 या वेळेत प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यात दीर्घ पल्ल्याच्या व उपनगरीय गाड्यांमध्ये तात्पुरते बदल करण्यात येतील.
या कालावधीत होणारे बदल
सीएसएमटी–चेन्नई एक्स्प्रेसला लोणावळा स्थानकात अतिरिक्त 5 मिनिटांचा थांबा.
पुणे उपनगरीय लोकल सेवेवर थेट परिणाम
काही लोकलचे वेळापत्रक बदलले जाईल
काही गाड्या उशिराने धावतील
मध्य रेल्वेने प्रवाशांना प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासण्याचे आवाहन केले आहे.
१० डिसेंबर : चार तासांचा नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक
या दिवशी दुपारी 1 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणखी एक महत्त्वाचा ब्लॉक जाहीर आहे. याचा पुणे विभागातील अनेक गाड्यांवर परिणाम होणार आहे.
ज्या गाड्यांना तात्पुरते थांबे (10 ते 30 मिनिटे)
नागरकोईल–सीएसएमटी एक्स्प्रेस
पुणे–सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस
दौंड–इंदौर एक्स्प्रेस
याशिवाय, पुणे उपनगरीय लोकल सेवेतही
वेळापत्रकात बदल
काही गाड्या उशिराने किंवा बदललेल्या मार्गावर
काम पूर्ण झाल्यानंतरचा लाभ
लोणावळा–बीव्हीटी यार्डमध्ये सुरू असलेले मार्गविस्ताराचे हे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यानंतर,
गाड्यांची वाहतूक क्षमता वाढेल,
रेल्वे ऑपरेशन अधिक सुरळीत आणि वेगवान होईल,
आणि भविष्यातील रेल्वे चालना अधिक सक्षम होणार आहे.

