- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather Alert : थंडीचा हाहाकार! महाराष्ट्रात बुधवारी कोल्ड वेव्हचं महासंकट! या 11 जिल्ह्यांना 'अलर्ट'
Maharashtra Weather Alert : थंडीचा हाहाकार! महाराष्ट्रात बुधवारी कोल्ड वेव्हचं महासंकट! या 11 जिल्ह्यांना 'अलर्ट'
Maharashtra Weather Alert : हवामान विभागाने महाराष्ट्रात 9 ते 11 डिसेंबर दरम्यान तीव्र थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील 11 जिल्ह्यांमध्ये तापमान 7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात कोल्ड वेव्हचे संकट! 11 जिल्ह्यांना अलर्ट
मुंबई : राज्यातील हवामान अचानक थंड झाले असून, पुढील तीन दिवस 9, 10 आणि 11 डिसेंबर महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याचा अंदाज असून, नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
10 डिसेंबरला राज्यातील हवामान कसे असेल?
मुंबई आणि कोकण, गारठ्यात वाढ
मुंबई शहर आणि उपनगरात तापमानाची मोठी घसरण झाली असून 10 डिसेंबरला आकाश स्वच्छ आणि निरभ्र राहणार आहे.
किमान तापमान : 15°C
कोकणातील इतर भागातही अशीच स्थिती पाहायला मिळेल.
पश्चिम महाराष्ट्र : थंडीचा कडाका चरमसीमेवर
पुणे, सोलापूर आणि आसपासच्या भागात गारठा अधिक तीव्र होणार आहे.
पुणे तापमान : 8°C, पुढील दोन दिवस 7°C पर्यंत घसरण अपेक्षित
सोलापूर : यलो अलर्ट
नागरिकांनी थंडीपासून संरक्षणासाठी योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
उत्तर महाराष्ट्र : थंडीचा रेड इशारा
उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घसरण नोंदवली जाणार आहे.
नाशिक : 7°C
जळगाव : 6°C
नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर या पाचही जिल्ह्यांना थंडीचा गंभीर इशारा देण्यात आला आहे.
मराठवाडा : सकाळ-रात्र गारठा, दुपारी तीक्ष्ण ऊन
मराठवाड्यात वातावरणात मोठा तफावत जाणवत आहे. सकाळी व रात्री कडाक्याची थंडी तर दिवसा तीक्ष्ण ऊन.
यलो अलर्ट : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी
विदर्भ : थंडीत थोडी घट, पण सावधगिरी आवश्यक
विदर्भातील थंडी किंचित कमी झाली असली तरी वातावरणात गारवा टिकून आहे.
नागपूर : 9°C
अमरावती : 11°C
10 डिसेंबरला विदर्भातील कोणत्याही जिल्ह्यात कोल्ड वेव्ह नसली तरी तापमान कमी राहणार आहे.
11 डिसेंबरपर्यंत थंडीचा इशारा, प्रशासन सतर्क
राज्यातील अनेक ठिकाणी कोल्ड वेव्हचा इशारा कायम असून, वृद्ध, लहान मुले आणि आरोग्याच्या समस्या असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

