- Home
- Maharashtra
- भाविकांसाठी बंपर गिफ्ट! शिर्डी आणि तिरुपतीला जाणाऱ्यांसाठी आता साप्ताहिक स्पेशल रेल्वे; लगेच पाहा संपूर्ण वेळापत्रक!
भाविकांसाठी बंपर गिफ्ट! शिर्डी आणि तिरुपतीला जाणाऱ्यांसाठी आता साप्ताहिक स्पेशल रेल्वे; लगेच पाहा संपूर्ण वेळापत्रक!
Tirupati To Shirdi Weekly Express : रेल्वे बोर्डाने तिरुपती आणि श्री साईनगर शिर्डी या दोन प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या नव्या साप्ताहिक एक्स्प्रेसला मंजुरी दिली. ही सेवा १४ डिसेंबरपासून नियमितपणे सुरू होणार असून, ती छत्रपती संभाजीनगरमार्गे धावेल.

तिरुपती–शिर्डीला आता धावणार नवी साप्ताहिक एक्स्प्रेस
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील भाविकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. तिरुपती आणि श्री साईनगर शिर्डी या दोन प्रमुख देवस्थाने आता थेट रेल्वेमार्गाने जोडली जाणार आहेत. या दोन तीर्थक्षेत्रांदरम्यान नवी साप्ताहिक एक्स्प्रेस सेवा सुरू करण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली असून १४ डिसेंबरपासून ही सेवा नियमितपणे प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.
९ डिसेंबर रोजी विशेष उद्घाटन रेल्वे धावणार
या सेवेला सुरूवात करण्यापूर्वी ९ डिसेंबर रोजी विशेष उद्घाटन रेल्वे धावणार आहे. या उद्घाटनाचा कार्यक्रम रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेने दिली आहे.
नवीन एक्स्प्रेसचे वेळापत्रक व मार्ग
17425/17426 क्रमांकाची ही साप्ताहिक एक्स्प्रेस तिरुपतीहून दर मंगळवारी सकाळी 11.10 वाजता सुटेल. गुंटूर, सिकंदराबाद, विकाराबाद, परळी, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर अशा महत्त्वाच्या स्थानकांवरून ही गाडी पुढे मार्गक्रमण करेल.
बुधवारी दुपारी सुमारे 12.58 वाजता ही एक्स्प्रेस छत्रपती संभाजीनगरात पोहोचेल. त्यानंतर पुढील प्रवास करत ही गाडी बुधवारी संध्याकाळी 6.35 वाजता श्री साईनगर शिर्डी स्थानकात दाखल होईल.
भाविकांसाठी मोठा दिलासा
या नव्या साप्ताहिक रेल्वेमुळे तिरुपती व शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना अधिक थेट, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच दोन्ही तीर्थक्षेत्रांतील वाहतूक व्यवस्थेलाही मोठा दिलासा मिळणार आहे.

