आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी एका कार्यक्रमानिमित्त एकमेकांशी हस्तांदोलन करत चर्चा केली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू असताना ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
राज्य सरकारच्या शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात मनसे आणि शिवसेना एकत्र येऊन मोर्चा काढणार आहेत. राज ठाकरे यांनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली, पण तोडगा न निघाल्याने मोर्चाची घोषणा केली. जेएनपीटी भरती प्रकरणीही मनसेने आवाज उठवला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. रेलिंगच्या पलीकडे रुमाल घेण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा पाय घसरून दरीत पडला. कोल्हापूरहून आलेला हा युवक मित्रांसोबत फिरण्यासाठी आला होता.
पंढरपूरच्या आषाढी वारीत "रिंगण" ही एक विशेष परंपरा असते, ज्यामध्ये संतांच्या पालखीतील अश्व (घोडे) उघड्या मैदानात वर्तुळाकार धावतात. या प्रसंगाला "रिंगण" म्हणतात.
संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावे १५० कोटी किमतीची तीन एकर जमीन करून देण्यात आल्याचा आरोप आहे. हैदराबादमधील सालार जंग कुटुंबीतील वंशजांनी ही जमीन भेट दिल्याचे म्हटले जात असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
एअर इंडियाच्या अपघातानंतर विमान सुरक्षेबाबत चिंतेचे वातावरण असतानाच, आता स्पाइसजेटविरोधात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.पुणे विमानतळावर उतरलेल्या स्पाइसजेटच्या विमानातील प्रवाशांना जबरदस्त धक्का बसला.
राज्यात शिक्षणव्यवस्थेत हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात आता मराठी अस्मिता रक्षणासाठी मोठा एल्गार होताना दिसतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुढाकाराने ५ जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे.
लोकशाहीत सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या नेत्यांकडून संयमित, सुसंस्कृत आणि जबाबदारीच्या भाषेची अपेक्षा असते. बबनराव लोणीकर यांचं वक्तव्य या सगळ्याच्या विरुद्ध असल्यामुळे त्यांच्या विरोधात जनमानसात असंतोष पसरला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राज्यातील वीज ग्राहकांच्या वीज बिलाच्या दरात कपात होणार असल्याची घोषणा केली. या पाठोपाठ आता महावितरण कंपनीनेही मुंबईकरांना स्वस्त दरात वीज देण्याचा निर्णय घेतला आहे.
विदर्भात पावासाचा जोर वाढल्याचे दिसून आले आहे. यामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. याशिवाय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Maharashtra