आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी एका कार्यक्रमानिमित्त एकमेकांशी हस्तांदोलन करत चर्चा केली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू असताना ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे हे दोघेही कायमच चर्चेत असतात. ते दोघेही आपआपल्या पक्षाचे मत प्रसिद्धी माध्यमांमधून मांडत असतात. आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे हे दोघे समोरासमोर आल्यावर दोघांनी हस्तांदोलन केलं आणि हास्य विनोद करत चर्चाही केली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
दोघांमध्ये झाली सकारात्मक चर्चा
आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. एका टीव्ही चॅनेलच्या कार्यक्रमानिमित्त या दोघांनी हजेरी लावली होती. आदित्य ठाकरे यांनी मुलाखत संपल्यानंतर स्टेजवरून ते खाली आले आणि त्यांची भेट संदीप देशपांडे यांच्यासोबत झाली. यावेळी दोघांनी एकमेकांकडे बघून हात हातात घेऊन २ मिनिटे चर्चा केली.
वरून सरदेसाई यांनी घेतली संदीप देशपांडेंची भेट
आमदार वरून सरदेसाई यांनी संदीप देशपांडे यांची भेट घेतली आहे. यावेळी वरून यांनी म्हटलं आहे की, "आम्ही कायमच भेटत असतो, आमचे संबंध चांगले आहेत. हिंदी भाषेला विरोध करण्याच्या मुद्यावरून आम्ही एकत्र मोर्चा काढणार आहोत. त्याबाबतची माहिती घेण्यासाठी आम्ही भेट घेतली आहे." यावेळी दोघांनी एकमेकांकडे पाहून हास्य केलं.
