संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावे १५० कोटी किमतीची तीन एकर जमीन करून देण्यात आल्याचा आरोप आहे. हैदराबादमधील सालार जंग कुटुंबीतील वंशजांनी ही जमीन भेट दिल्याचे म्हटले जात असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

सध्याच्या काळात अनेक नेत्यांचे भ्रष्टाचार करण्याचे प्रकरण उघडकीस येत आहेत. खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावे १५० कोटी किमतीची जमीन असल्याचा खुलासा झाला आहे. हि ३ एकर जमीन भुमरे यांचे ड्रायव्हर जावेद रसूल यांच्या नावावर आहे. या ड्रायव्हरशी व्यक्तिगत पातळीवर कोणतेही संबंध नसल्याचा खुलासा विलास भुमरे यांच्याकडून करण्यात आला आहे.

ड्रायव्हरच्या नावावर १५० कोटींची जमीन

ड्रायव्हर जावेद रसूल याच्या नावावर हैदराबादमधील सालार जंग कुटुंबीतील वंशजानं १५० कोटींची जमीन केली. एका वकिलाने दाखल केलेल्या तक्रारीवरून या प्रकरणाचा उलगडा होत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिसांनी ड्रायव्हरला आयकर रिटर्नच्या प्रती, उत्पन्नाचे स्थापित स्रोत आणि गिफ्टवर कोणत्या आधारावर स्वाक्षरी करण्यात आली, याबाबतची माहिती मागितली आहे.

परभणीतील वकिलाने तक्रार केली दाखल

परभणी येथील वकिलाने भुमरे कुटुंबाची तक्रार दाखल केली आहे. कोणत्या आधारावर सालार जंग कुटुंबातील वंशजांनी जमिनीच्या कागदांवर स्वाक्षरी केली याबाबची माहिती स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. सालार जंग वंशज मीर मजहर अली खान आणि त्यांच्या सहा नातेवाईकांनी स्वाक्षरी केलेल्या हिबानामाची चौकशी सुरू आहे. सालार जंग हे प्रमुख कुलीन कुटुंब असून त्यांचे सदस्य हे पूर्वीच्या हैद्राबाद इस्टेट एजंटमध्ये पंतप्रधान होते.

संदीपान भुमरे आणि विलास भुमरे कोण आहेत?

संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी एमएमआयच्या इम्तियाज जलील आणि शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. ते एकनाथ शिंदे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात असून त्यांचे चिरंजीव विलास भुमरे हे पैठण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेत.