ठाणे येथील एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका 75 वर्षीय वृद्धाला जळत्या निखाऱ्यावर चालवण्यात आल्याची घटना घडली आहे. खरंतर, वृद्ध व्यक्ती काळी जादू करतो असा त्याच्यावर संशय व्यक्त केला जात होता.
पुणे येथील रस्त्यांवर स्क्रू फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा एक व्हिडीओ देखील स्थानिक नागरिकाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. याशिवाय पुणेकरांनी रस्त्यावर कोणीतरी मुद्दाम स्क्रू फेकल्याने संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाशिममध्ये अनावरण करण्यात आले आहे. या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचे काही फोटो समोर आले आहेत.
शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना 2 मार्चला आपल्या निवासस्थानी भोजनासाठी निमंत्रण पाठवले होते. पण तिघांनीही शरद पवारांचे निमंत्रण नाकारले आहे.
पालघरमध्ये दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे. खरंतर, आरोपी मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात आहे.
मंत्रालयातून जारी केल्या जाणाऱ्या शासकीय कागदपत्रांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी स्वाक्षरी आणि शिक्के वापरले गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात मरीन लाइन्स पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यादरम्यान विविध प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. जाणून घ्या सविस्तर माहिती….
विधानसभेच्या अधिवेशनात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी वेळोवेळी केलेल्या वादग्रस्त विधानांवरुन वाद निर्माण झाला. अशातच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिंदे सरकारकडून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. अशातच जरांगेंच्या मागण्या दिवसागणिक वाढत चालल्या असून त्यांची भाषा राजकीय पद्धतीची झाल्याचे दिसून येत आहे.
अजित पवारांनी खुले पत्र लिहून आपण भाजप आणि शिवसेना पक्षासोबत हातमिळवणी का केली याबद्दलचे स्पष्टीकरण दिले आहे. याशिवाय अजित पवारांनी म्हटले की, "माझी काम करण्याची पद्धत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखी आहे."