पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या कार अपघातात तीन जण जखमी झाले तर कॅम्प भागात इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला. बांधकाम आणि रस्ते सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडच्या दापोडी भागात झालेल्या कार अपघातात तीन जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. घटनेनंतर लगेचच जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला आहे. अपघात झाल्यानंतर पोलिसांनी हजेरी लावली होती.

इमारतीचा स्लॅबचं कोसळला 

याच्या एक दिवस आधी पुणे शहरातील कॅम्प भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला होता, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेत तीन जण जखमीही झाले होते. बांधकाम सुरु असताना काळजी घेणं आवश्यक आहे. हेल्मेट डोक्यात घालणे, चांगले शूज वापरणे काम करताना गरजेचं असतं.

बांधकाम सुरु असताना काळजी घेणं आवश्यक 

बांधकाम सुरु असताना काळजी घेणं आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी जीव धोक्यात घालून मजूर काम करत असतात. त्यांच्या सुरक्षिततेची बांधकाम कंपनीच्या वतीने काळजी घेतल्यास त्यांना जीविताची चिंता राहणार नाही. रस्त्यावरून गाडी चालवताना काळजी घेणं आवश्यक आहे. सध्याच्या काळात अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.