छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल विट्सच्या लिलाव प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहारांमुळे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधान परिषदेत या प्रकरणावर जोरदार चर्चा झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लवकरच मेगाभरती केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. विविध विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतल्यानंतर भरतीचे नियोजन केले जाईल.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी आणि हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादात उडी घेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दुबे यांचे समर्थन केले आहे.
मनसेकडून आज (08 जुलै) सकाळी 10 वाजता मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढला जाणार आहे. तत्पूर्वी पोलिसांकडून पहाटेच मनसेचे अविनाश जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शिक्षण विभागाने यावर आता स्पष्ट भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पाळेकर यांनी अधिकृत आदेश काढत स्पष्ट केले आहे की ८ व ९ जुलै रोजी राज्यातील शाळा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
या प्रकरणात स्वतः त्या बाळाचे जन्मदाते पालकही सामील असल्याचे स्पष्ट झाले असून, हा प्रकार विधीसंवेष्टित बालक अधिनियम (Juvenile Justice Act) आणि इतर संबंधित कायद्यांअंतर्गत गुन्हा ठरवण्यात आला आहे.
पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाला सदनिकेचा ताबा वेळेवर न दिल्याचा फटका बसला असून, महारेराने त्याच्यावर कठोर कारवाई करत ठोस आदेश दिला आहे. प्रकल्पात झालेल्या विलंबासाठी घर खरेदीदाराला दरमहा व्याज द्यावे, असे आदेश महारेराने दिले आहेत.
महाराष्ट्रात पावसाचे असमान वितरण झाले असून काही भागात अतिवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला.
पावसामुळे कांदा उत्पादकांना झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची मागणी केली आहे. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत ५ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना मदत करण्याची विनंती केली
पुणे रेल्वे स्थानकासमोरील गांधी पुतळ्यावर एका तरुणाने कोयत्याने हल्ला केला. भगवे वस्त्र परिधान केलेल्या या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, काँग्रेसने निषेध व्यक्त केला आहे.
Maharashtra