भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी आणि हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादात उडी घेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दुबे यांचे समर्थन केले आहे.
Mumbai: महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषा यावरून वाद सुरु झाला आहे. या वादात भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी उडी घेतली आहे. "तुम्ही कोणाच्या भाकरी खात आहात? , महाराष्ट्र कोणाच्या पैशांवर जगतोय अशा कडव्या शब्दात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे. या वादात आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे. त्यांनी दुबे यांच्या वक्तव्याच समर्थन केलं आहे.
सदावर्ते काय म्हणाले?
सदावर्ते म्हणाले की, पहिला व्यक्ती असून ज्यांन दुबे यांना कॉल करून त्यांची भूमिका समजावून घेतली आहे. त्यांनी मराठीला विरोध केला असून त्यांनी संविधान नियमानुसार त्यांचं मत व्यक्त केलं आहे. आपण भारतात राहत असून सर्वजण हिंदू आहे. आपलं नागरिकत्व हे भारतीयत्व असून त्यामुळे मी त्यांच्याशी त्या नात्याने संवाद साधला आहे. त्यांच्या वक्तव्यामध्ये कुठेही तेढ निर्माण करावा असं काही नव्हतं. काही गोष्टी ज्या आहेत त्या ढोबळ मनाने सहज बोलणारी म्हणजे हे असं करु नका रे, तुम्ही टिपून मारू नका रे, तुम्ही हिंदुंनाच मारत आहात, असं म्हटलं आहे.
ठाण्यात मारहाण केली की ते कोणत्या समाजाचे होते? मीरा भाईंदरमध्ये मारहाण केली, ते कोणत्या समाजाचे होते? माहीम येथे उद्धव यांच्या पक्षाचा आमदार आहे, ते तिथं जाऊन कोणती भाषा वापरतात? खरं तर संपूर्ण देशाची भाषा ही हिंदी असून आपण हिंदू आहोत, असं सदावर्ते यांनी मत व्यक्त केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दुबे काय म्हणाले होते?
“मुंबईत हिंदी भाषिकांना मारणाऱ्यांमध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना देखील मारून दाखवा. आपल्या घरात कुत्राही वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ आता ते तुम्हीच ठरवा.” असं दुबे यांनी मत व्यक्त केलं होत. त्यावर प्रत्युत्तर देताना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी दुबेला उचलून आपटू अशी प्रतिक्रिया दिली होती.
