सांगली जिल्ह्यात भीषण अपघात घडला असून यामध्ये जागीच सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अल्टो गाडीचा रात्रीच्या वेळी दीड वाजता कॅनलला धडकून भीषण अपघात झाला, अपघात एवढा भीषण होता की गाडीतील सहा जणांचा मृत्यू जागीच झाला आहे.
पुणे येथील कल्याणीनगर अपघातातील नवीन खुलासे समोर येत असून रक्ताच्या सॅम्पलमध्ये पैशांच्या बदल्यात बदल करण्यात आल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात ससून रुग्णालयातील अजय तावरे यांना अटक करण्यात आली आहे.
पुणे अपघातस्थळी रोज नवीन घटना घडल्याचे दिसून येत आहे. घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार येथे अल्पवयीन आरोपीने उपस्थित असणाऱ्या लोकांना तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो, मला सोडून द्या असं म्हटल्याचे सांगितले आहे.
पुण्यातील अल्पवयीन मुलाच्या हिट अँड रन प्रकरणात आज तपास पथकाने ससून रुग्णालयात येऊन चौकशी केले असता आणखी गंभीर प्रकार समोर आले आहेत. मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करण्यासाठी ससूनच्या दोन डॉक्टरांनी तीन लाख रुपये घेतल्याचं समोर आले आहे.
पुढील 48 तासात मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यालाही पाऊस पडणार आहे.
आगामी पाच दिवसांमध्ये केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठीचे अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. मान्सूनने आपल्या प्रवासाचा वेग वाढवला आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
ससूनच्या रक्त चाचणी विभागातील कर्मचारी नॉट रिचेबल, संशय वाढला, पोलिसांची सावध भूमिका. पुणे रक्त चाचणी विभागातून ब्लड सॅम्पल बदलल्यानंतर एसआयटीकडून चौकशी. डॉ. पल्लवी सापळे एसआयटीच्या प्रमुख.
पुणे येथे भावांची दोन कोटींचे ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये नुकसान झाले असून याबद्दलची तक्रार त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. व्हॉट्सॲप ग्रुपवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ही कारवाई करण्यात आली होती.
पुणे शहरात सध्या अपघात मोठ्या प्रमाणावर होत असून येथे रात्री ट्रकने गाडीला उडवल्यामुळे दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाले आहे. ट्रकचालकाला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मी सर्वांची नावं घेणार, शांत बसणार नाही, डॉ. अजय तावरे यांनी पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे.