जळगावमध्ये शेअर बाजारातील नुकसानीमुळे नातवाने आजीचा कुऱ्हाडीने हल्ला करून जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आजीने नातवाला कर्ज काढण्यापासून रोखल्याने त्याने हे कृत्य केले.
Jalgaon: शेअर बाजारातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळत असल्याने गुंतवणूकदार बराच काळ वाट पाहतात. काही लोकांची फसवणूक झाली असून आणि काहीजण कर्जात फसून गेले आहेत. शेअर बाजाराच्या नादापायी अनेक जणांनी गुन्हे केले आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी नातू लोकांकडून उधार पैसे घेत होता, त्याला आजीने हटकले. नातवाला आजीचा राग आला आणि त्यानं आजीवर हल्ला केला. त्या हल्यात आजी जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.
नातवाने भाजीवर कुऱ्हाडीने केला हल्ला
जळगाव शहरातील जवाहर रोडवरील श्रीराम मंदिराजवळ राहणाऱ्या आपल्या मुलीकडे आलेल्या 73 वर्षीय लीलाबाई रघुनाथ विसपुते यांच्यावर त्यांच्या नातवानेच कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्यात आजी गंभीर जखमी झाली होती. आजीने तब्बल १२ दिवस संघर्ष केला पण तिचा मृत्यू झाला आहे. अखेर मंगळवारी त्यांनी प्राण सोडला आहे.
नातवानेच केला जीवघेणा हल्ला
ही धक्कादायक घटना २६ जून रोजी घडली होती. लीलाबाई विसपुते या त्यांच्या मुलीकडे राहायला आल्या होत्या, त्यावेळी त्यांचा नातू तेजस त्यांच्यासोबत राहत होता. तेजस याने आजीवर कुऱ्हाडीने हल्ला केला आणि त्यात त्या जखमी झाल्या होत्या. त्यांना सुरुवातीला जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण नंतर पुण्यात उपचार करण्यात आले.
पोलीस तपासात यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. शेअर बाजारात तेजसचे पैसे अडकले असल्यामुळे आजीने लोकांकडून उधार पैसे घेऊ नकोस असं त्याला बजावलं होत. त्यावेळी तेजसला राग आला आणि त्यानं आजीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यातच आजी गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.
परिसरात संतापाचे वातावरण
या घटनेने धरणगाव हादरून गेले असून नातवाने आजीचा जीव घेतला असून त्यामुळं सगळीकडे वातावरण संतापाचे तयार झाले आहे. तेजस पोद्दार याला धरणगाव पोलिसांनी तात्काळ अटक केली असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. आता पुढील तपासात बाकी गोष्टी समजणार आहेत.
