Nagpur Flood : नागपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक सखल भागात पाणी साचले आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, NDRF आणि SDRFची पथके सतर्क आहेत. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बचावकार्य सुरू आहे.

नागपूर : पूर्व विदर्भातील नागपूर शहर आणि जिल्ह्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांची पथके तयार ठेवण्यात आली आहेत.

शहरातील नंदनवन, हुडकेश्वर, नरसाळा, बेलतरोडी, पारडी, नरेंद्रनगर यांसारख्या नाग नदी आणि नाल्यांच्या काठावरील अनेक सखल वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने बोटींच्या मदतीने अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. सुदैवाने, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही.

शाळांना सुट्टी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, बुधवारी नागपूरचे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे जिल्हा प्रशासनाने आज जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनाही स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

नद्यांची पाणी पातळी वाढली, बचावकार्य सुरू

जिल्ह्यात कन्हान नदीची पाणी पातळी वाढली असून, नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कामठी तालुक्यातील पांढुर्णा गावात पुरात अडकलेल्या ८ व्यक्तींना बोटींच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. सावनेर तालुक्यातही पावसाने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. नाले आणि नद्यांचे पाणी रस्त्यांवर आणि पुलांवरून वाहत असल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे.

 पूर्व विदर्भातील नागपूर शहर आणि जिल्ह्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांची पथके तयार ठेवण्यात आली आहेत.