Special Train : नागपुर ते मडगावदरम्यान जूनपर्यंत चालवली जाणार स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

| Published : Mar 28 2024, 08:57 AM IST / Updated: Mar 28 2024, 08:59 AM IST

Train Ticket Transfer Rules

सार

नागपुर ते मडगाव ट्रेन येत्या 8 जूनपर्यंत चालवली जाणार आहे. याशिवाय मडगाव ते नागपुर दरम्यान स्पेशल ट्रेन 9 जूनपर्यंत धावणार आहे.

Special Train : राज्याच्या विदर्भ आणि कोकणपट्टीला जोडणारी नागपुर (Nagpur)- मडगाव (Madgaon) स्पेशल ट्रेन 30 मार्चएवजी 30 जूनपर्यंत चालवली जाणार आहे. नागपुर ते मडगाव दरम्यानची ट्रेन येत्या 8 जूनपर्यंत चालवली जाणार आहे. ट्रेन क्रमांक 01139 नागपुर - मडगाव आणि ट्रेन क्रमांक 0140 मडगाव - नागपुर ट्रेन गेल्या दोन वर्षांपासून चालवल्या जात आहेत. या ट्रेन कोकण आणि मध्य रेल्वेकडून विशेष भाड्यावर चालवल्या जात आहेत. यामुळे कोकण आणि विदर्भात प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कोकण आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडे प्रवाशांची मागणी
कोकण आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडे प्रवाशांनी नागपुर ते मडगाव दरम्यानच्या ट्रेनच्या सुविधेची मागणी केली जात होती. यामुळे ट्रेनची सेवा सातत्याने नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. याशिवाय नागपुर ते मडगाव ट्रेनची सेवा 30 डिसेंबर ते मार्च, 2024 पर्यंत आणि मडगाव ते नागपुर ट्रेन सेवा 31 मार्च, 2024 पर्यंत करण्यात आली होती. पण आता नागपुर ते मडगाव ट्रेनची सुविधा 8 जून आणि मडगाव ते नागपुर ट्रेनची सुविधा 9 जूनपर्यंत सुरू राहणार आहे.

असे आहे वेळापत्रक 
ट्रेन क्रमांक 01139 नागपुर ते मडगाव द्वि-साप्ताहिक नागपुर स्पेशन 12 जून ते 29 जूनपर्यंत प्रत्येक बुधवार आणि शनिवारी दुपारी 3 वाजून 5 वाजता सुटणार आहे. ही ट्रेन दुसऱ्या दिवसी संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी मडगाव येथे पोहोचणार आहे.

ट्रेन क्रमांक 01140 मडगाव ते नागपुर द्वि-साप्ताहिक स्पेशल 13 जून ते 30 जूनपर्यंत प्रत्येक गुरुवार आणि रविवारी संध्याकाळी 7 वाजता सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी नागपुरला पोहोचणार आहे.

दोन्ही दिशांच्या ट्रेन वर्धा, पुलगाव, धामनगाव, बडनेरा, अकोला, शेगांव, मलकापुर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापुर रोड, कणकवली, कुडाळथिवी आणि करमाली येथे थांबणार आहे.

आणखी वाचा : 

Maharashtra Earthquake : हिंगोली जिल्ह्यात 4.5 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद

गडचिरोली येथे चार नक्षलवादी ठार, लोकसभा निवडणुकीवेळी गडबड करण्याचा रचला होता कट

परिवहन विभागाच्या 187 इंटरसेप्टर वाहनांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण