गडचिरोली येथे चार नक्षलवादी ठार, लोकसभा निवडणुकीवेळी गडबड करण्याचा रचला होता कट

| Published : Mar 19 2024, 10:18 AM IST / Updated: Mar 19 2024, 10:20 AM IST

4-hour encounter with Naxalites, names of martyred soldiers came to light

सार

गडचिरोली येथे पोलीस आणि C-60 कमांडोंनी संयुक्त कार्यवाही करत चार नक्षलवाद्यांना ठार केले आहे. नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्रास्रे जप्त करण्यात आली आहेत.

Maharashtra : लोकसभा निवडणुकीआधी (Lok Sabha Elections) महाराष्ट्र पोलीस आणि C-60 कमांडो यांच्या संयुक्त कार्यवाहीच्या माध्यमातून गडचिरोलीत (Gadchiroli) चार नक्षलवाद्यांना (Naxalites) ठार करण्यात आले आहे. चारही नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्रास्रेही सापडली आहेत. या शस्रांमध्ये AK-4, एक कार्बाइन आणि दोन पिस्तुल सापडल्या आहेत. गोळीबार होत असलेल्या परिसरात पोलीस आणि सी-60 कमांडोकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे.

नक्षलवाद्यांबद्दल मिळाली होती टीप
गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यानुसार, सोमवारी (18 मार्च) तेलंगणातील राज्य समितीच्या काही सदस्यांद्वारे आगामी लोकसभा निवडणुकीत गडबड निर्माण करण्याचा कट रचल्याची टीप मिळाली होती. यानंतर अशी माहिती मिळाली की, नक्षलवाद्यांचा एक गट तेलंगणातून गडचिरोलीतील प्राणहिता नदी पार करून जिल्ह्यात आला आहे.

राज्य सरकारने नक्षलवाद्यांवर लावले होते बक्षीस
गुप्त माहिती मिळाल्यानंतर रेनपल्ली येथून पाच किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या कोलामरका पर्वतांजवळ (Kolamarka mountains) मंगळवारी (19 मार्च) सकाळपासून सर्च ऑपरेशनदरम्यान 4 सी 60 च्या एका पथकावर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. याला सडेतोड उत्तर देत सी 60 च्या कमांडोंनी चार नक्षलवाद्यांना ठार केले. दरम्यान, ठार करण्यात आलेल्या चारही नक्षलवाद्यांवर महाराष्ट्र सरकारकडून 36 लाख रुपयांचे बक्षीस लावण्यात आले होते.

आणखी वाचा :

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या घोषणेआधी काँग्रेसचा मोठा निर्णय, सांगली येथून विशाल पाटील यांना उतरवण्याचा निर्णय

दहशतवादी कारवायांमध्ये वापरलेल्या स्थावर मालमत्ता एनआयएने केल्या जप्त

लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे दिल्लीत दाखल, NDA मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांना उधाण

Read more Articles on