सार

Mumbai Weather : कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. मुंबईत बुधवारी (17 एप्रिल) तापमान 39.7 डिग्री सेल्सिअसवर पोहोचले गेले. अशातच हवामान विभागाने अ‍ॅलर्ट जारी केला आहे.

Mumbai Weather Update : मुंबईत मंगळवारी तापमानचा पारा वाढल्याचे दिसून आले. शहरात तापमान 39.7 डिग्री सेल्सिअसवर पोहोचल्याची माहिती हवमान खात्याने दिली. हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्यांनी म्हटले की, 16 एप्रिलला सांताक्रुझ येथील वेधशाळेने 39.7 डिग्री तापमानाची केली आहे. याशिवाय कुलाबा येथील वेधशाळेने 35.2 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे.

14 वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक
मुंबईतील हवामाना खात्याच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी म्हटले की, मंगळवारी (16 एप्रिल) 39.7 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद केली होती. यामुळे गेल्या 15 वर्षातील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमान होते. दरम्यान, 2 एप्रिल 2009 रोजी शहरातील तापमान 40.6 डिग्री सेल्सिअसवर पोहोचले होते.

सोमवारी (15 एप्रिल) कुलाबा आणि सांताक्रुझ वेधशाळेकडून मुंबईतील तापमान क्रमश: 37.9 डिग्री सेल्सिअस आणि 34.7 डिग्री सेल्सिअस दाखल करण्यात आले होते.

हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा अंदाज
गेल्या दोन दिवसांसाठी आयएमडीकडून मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिला होता. दोन दिवस ठाणे आणि रायगडमधील काही ठिकाणचे तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या पार गेले होते. (Mumbai madhil ajche tapman)

दरम्यान, मुंबईत बुधवारी वाढत्या तापमानापासून नागरिकांना दिलासा मिळाला. कुलाबा आणि सांताक्रुज .वेधशाळेने 34 डिग्री आणि 34.7 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद केली. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, बुधवारी तापमानात दोन-तीन डिग्री सेल्सिअसची घट होण्याचा अंदाज होता. पण वास्तविक चार ते पाच डिग्री सेल्सिअस झाली. मुंबईकरांना गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहेत. अशातच हवामान खात्याने अ‍ॅलर्टही जारी केला आहे.

आणखी वाचा : 

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो लक्ष द्या! वांद्रे-धारावीसह या ठिकाणी 18-19 एप्रिलला पाणी कपात

मुंबईतील उष्माघाताचा मुलांना त्रास, जुलाब आणि उलट्यांच्या समस्यांमध्ये वाढ