सार

Water Cut : वाढत्या उन्हाच्या झळांनी मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही केली आहे. अशातच वांद्र्यासह संपूर्ण धारावी परिसरात येत्या 18-19 एप्रिलला पाणी कपात असणार आहे. याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

Mumbai Water Cut : मुंबईकरांना पुन्हा एकदा पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. येत्या 18 आणि 19 एप्रिलला वांद्र्यासह धारावीतील बहुतांश ठिकाणी पाणी येणार नाही. काही ठिकाणी 25 टक्के पाणी कपात असणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

वांद्रे आणि धारावीत पाणी कपात
महापालिकेच्या हाइड्रोलिक डिपार्टमेंटनुसार, धारावीतील नवरंग कंपाउंड येथील 2400 मिली व्यासची पाइपलाइन जी वैतरणा मुख्य पाइप लाइन आहे त्याच्या डागडुजीसह जोडण्याचे काम केले जाणार आहे. यावेळी वांद्रे पूर्व येथे नागरिकांना पाणी मिळणार नाही. याशिवाय धारावीतील काही ठिकाणी 25 टक्के पाणी कपात असणार आहे. पाइप लाइन जोडण्याचे काम गुरुवारी (18 एप्रिल) सकाळी 10 वाजल्यापासून ते शुक्रवारी (19 एप्रिल) पहाटे 4 वाजेपर्यंत केले जाणार आहे.

या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही
वांद्रे पूर्व येथील वांद्रे रेल्वे टर्मिनस आणि वांद्रे स्थानकाच्या परिसरात 18 एप्रिल आणि 19 एप्रिलला पाणीपुरवठा केला जाणार नाही. जी नॉर्थ वॉर्ड अंतर्गत धारावी लूप मार्ग, नाइक नगर, प्रेम नगरमध्ये 18 एप्रिलला सकाळी पाण्याचा पुरवठा केला जाणार नाही. याशिवाय गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग, माहिम फाटक मार्ग परिसरात 18 एप्रिलला पाणी येणार नाही. (Mumbai madhe pani kapat)

या ठिकाणी 25 टक्के पाणी कपात
धारावीतील 60 फीट रोड, सायन-माहिम लिंक रोड, 90 फीट रोड, महात्मा गांधी मार्ग, एकेजी नगर आणि एपमी नगरमध्ये 18 एप्रिलला सकाळी 25 टक्के पाणी कपातीचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे.

मुंबईत याआधी 15 टक्के पाणी कपात
मार्च महिना सुरू होण्याच्या काही दिवसांपासून मुंबईतील नागरिकांसाठी 15 टक्के पाणी कपातीचा निर्णय महापालिकेने घेतला होता. खरंतर, मुंबई महापालिकेच्या पिसे येथील जलउदंचन केंद्रातील ट्रान्सफार्मरला 26 फेब्रुवारी आग लागली होती. यामुळे पाणी पुरवठा बाधित झाला होता. अशातच 15 टक्के पाणी कपातीचा निर्णय मुंबईकरांसाठी घेण्यात आला होता.

आणखी वाचा : 

Weather Update : महाराष्ट्रातील काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम, मुंबईतही तापमान वाढणार

दुकान आणि संस्थांवर मराठी बोर्ड नसल्यास Property Tax दुप्पट होणार, महापालिकेचा मोठा निर्णय