सार
मुंबईतील मुलांमध्ये गॅस्ट्रोच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. याशिवाय गरमीमुळे मुलांना उलटी, जुलाब आणि पोटादुखीचाही सामना करावा लागत आहे. अशातच डॉक्टरांनी मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला पालकांना दिला आहे.
Mumbai Weather : मुंबईत दिवसागणिक वाढणाऱ्या कडक्याच्या उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची ल्हाईल्हाई होत आहे. याचा परिणाम मुलांवर अत्याधिक झालेला दिसून येत आहे. अशातच मुंबईतील रुग्णालांमध्ये मुलांना पोटासंबंधित समस्या (Stomach problems in kids) होत असल्याची प्रकरणे दिवसागणिक वाढत चालली आहेत. याव्यतिरिक्त जुलाब आणि उलट्याच्या समस्येचाही सामना मुलांना करावा लागत आहे.
वरळी येथील स्पेशल हॉस्पिटल एनएच एसआरसीसीमध्ये मार्च महिन्याच्या अखेरीसपासून गॅस्ट्रोच्या तक्रारी (Gastro Problem) घेऊन येणाऱ्या मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुलांमध्ये उलटी (Vomiting), पोटदुखी आणि जुलाब (Diarrhea) अशी लक्षणे दिसून येत आहेत. हा त्रास मुलांना वाढत्या गरमीमुळे होत आहेत.
मुंबईत गॅस्ट्रोच्या रुग्णांच्या संख्येत वाढ
दक्षिण मुंबईतील एका खासगी रुग्णालयातील कंसल्टेंट पीडियाट्रिक डॉ. फजल नबी यांनी म्हटले की, गेल्या दोन आठवड्यांपासून गॅस्ट्रोच्या समस्या घेऊन येणाऱ्या मुलांमध्ये वाढ झाली आहे. रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये 30-35 रुग्णांपैकी 10 मुलांना गॅस्ट्रोची समस्या झाल्याचे दिसून येत आहे.
उन्हाळ्यातील वातावरणाचा होणार त्रास
शासकीय रुग्णालयातील एका डॉक्टरांनी म्हटले की, उन्हाळ्यातील वातावरण बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करते. अशातच उघड्यावरील पदार्थ अथवा घरात पदार्थ व्यवस्थितीत झाकून न ठेवल्यास त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होऊ शकतो. असे दूषित पदार्थांचे सेवन केल्याने पोटासंबंधित काही समस्या उद्भवू शकतात.
अशी घ्या आरोग्याची काळजी
पालकांनी मुलांना बाहेरील पदार्थांचे अत्याधिक सेवन करण्यापासून दूर ठेवावे. याशिवाय मुलांना बर्फयुक्त पदार्थांचे सेवन करण्यास देऊ नये. यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढला जातो. घरातील अन्नपदार्थ व्यवस्थितीत शिजवण्यासह पाणी उकळून प्यायला द्यावे.
राज्यात उष्णतेची लाट येणार
हवामान खात्याने महाराष्ट्रासह देशातील काही ठिकाणी एप्रिल ते जून महिन्यात उन्हाचा तडाखा बसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याशिवाय राज्यात राज्यात सुमारे 20 दिवस उष्णतेची लाट राहील. दरम्यान, काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने धाराशिव, नांदेड, लातूर आणि सोलापुरसाठी यल्लो अॅलर्ट जारी केला होता.
आणखी वाचा :
दुकान आणि संस्थांवर मराठी बोर्ड नसल्यास Property Tax दुप्पट होणार, महापालिकेचा मोठा निर्णय
Mumbai Weather : मुंबईत तापमानाचा पारा वाढणार, उन्हाच्या झळांपासून अशी घ्या आरोग्याची काळजी