सार

Mumbai Crime : मुंबईत एका 13 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियावर भेटलेल्या मित्रानेच अल्पवयीन मुलीवर दोनदा बलात्कार केल्याचे सांगितले जात आहे.

Mumbai Crime News : बदलापूर, खार आणि आता मुंबईत पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 21 वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी पीडित मुलीला सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटला होता. या दोघांमध्ये मैत्री झाली असता त्यानेच पीडित मुलीचा विश्वासघात करत तिच्यावर बलात्कार केला.

आरोपीकडून दोनदा बलात्कार
आरोपीने मैत्री झाल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीला अंधेरी येथे एका ठिकाणी घेऊन गेल्यानंतर पहिल्यांदा तेथे बलात्कार केला. यानंतर गुजरातला मुलीला घेऊन जात तेथेही आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी घरी परतली असता तिने घरातील मंडळींच्या तिच्यासोबत घडलेली सर्व घटना सांगितली. याशिवाय पीडित मुलीने पालकांना ज्या व्यक्तीची तिची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री झाली होती त्याचे फोटो दाखवले. यानंतर वाकोला पोलीस स्थानकात आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पॉक्सो कायद्यातील कलम 4,8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नक्की काय घडले?
रिपोर्ट्सनुसार, पीडित मुलगी 13 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान घरातून बेपत्ता झाली होती. यामुळे पालकांनी मुलीचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. यानंतर पीडित मुलगी स्वत:हून घरी आली. यावेळी पालकांनी मुलीला काही प्रश्न विचारले असता त्यावरही तिने काही उत्तर दिले नाही. पीडित स्वत: एकटीएकटी आणि शांत राहत होती.

एफआयआरनुसार, पीडितेला कुपर रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेले. कोर्टात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये पीडित मुलीच्या वैद्यकीय चाचणीचे रिपोर्ट्स लावण्यात आले आहेत. या प्रकरणात आरोपीच्या विरोधात अधिक चौकशी करण्यास सुरुवात केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

आणखी वाचा : 

Baldapur Crime : बदलापूर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून आज तातडीची सुनावणी

मुंबईत पुन्हा एकदा अल्पवयीन मुलींवर अत्याचार, खारमध्ये धक्कादायक प्रकार