Badlapur Crime : बदलापूर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून आज तातडीची सुनावणी

| Published : Aug 22 2024, 08:26 AM IST / Updated: Aug 22 2024, 09:42 AM IST

Bombay High Court
Badlapur Crime : बदलापूर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून आज तातडीची सुनावणी
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Badlapur School Crime : बदलापूर येथील दोन अल्पवयीन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण तापले आहे. या प्रकरणाची दखल मुंबई उच्च न्यायालयाकडून घेण्यात आली आहे.

Badlapur School Crime :  बदलापूर पूर्व येथील एका प्रसिद्ध शाळेतील दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक अत्याचार झाल्याने नागरिकांनी शहरात जोरदार आंदोलन केले. पीडित अल्पवयीन मुलींचे शाळेतील वॉशरुम स्वच्छ करणारा कर्मचारी अक्षय शिंदे या आरोपीने शोषण केले. रिपोर्ट्सनुसार, एक पीडित मुलगी चार वर्षांची तर दुसरी सहा वर्षांची आहे. घटना 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्टला घडलेली आहे.

बदलपूर प्रकरणाची दखल आता मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. आज (22 ऑगस्ट) तातडीची सुनावणी होणार आहे. न्यायाधीश रेवती मोहिते देरे आणि न्यायाधीळ पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाखाली सुनावणी पार पडणार आहे.

मुलींचे टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी अक्षयची नियुक्ती
आरोपी अक्षय शिंदेला 1 ऑगस्टला टॉयलेट स्वच्छ करण्याच्या आधारावर शाळेत कामावर भरती करण्यात आले होते. शाळेतील मुलींचे टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नव्हती. याचाच फायदा घेऊन आरोपीने 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्टला दोन अल्पवयीन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार केले. 

पीडित मुलीकडून पालकांकडे तक्रार
एका पीडित मुलीने शाळेतून घरी आल्यानंतर सातत्याने प्रायव्हेट पार्टच्या येथे दुखत असल्याचे सांगितले असता आई-वडील चिंतेत पडले. यावेळी मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. अशातच पालकांनी मुलीच्या वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांना फोन केला असता त्यांची मुलगी शाळेत जाण्यासाठी घाबरत असल्याचे सांगितले. दोन्ही मुलींना नक्की काय होतेय हे कळण्यासाठी डॉक्टरांकडे नेले असता आरोपीने मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांना बसवून ठेवले
या प्रकारानंतर दोन्ही मुलींच्या पालकांनी तातडीने रात्री 12.30 वाजता पोलीस स्थानकात धाव घेतली. यावेळी पालकांना तक्रार दाखल करण्यासाठी 12 तास पोलीस स्थानकात बसवून ठेवल्याचा आरोप केला जात आहे. अशातच जिल्हा महिला आणि बाल कल्याण अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे पोलिसांनी 17 ऑगस्टला सकाळी पॉक्सो अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. मुलींची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केल्यानंतर आरोपीच्या काही वेळानंतर मुसक्या आवळल्या.

एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेचा तपास करण्यासाठी एक एसआयटी स्थापन करण्याची आदेश दिले आहेत. याचे संचालन वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह करणार आहेत. त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना आरोपींच्या विरोधात कठोर कार्यवाही करण्यासाठी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेण्याचा एक प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला होता. याशिवाय प्रकरणातील वेळकाढूपणा केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात देखील कार्यवाही करण्यात आली आहे.

बदलापूर प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आरोपीला कठोर शिक्षा दिली जाईल. याशिवाय मुलींच्या विरोधातील अत्याचाराची एखादी घटना घडल्यास संस्थेच्या संस्थापकांच्या विरोधात कार्यवाही केली जाईल. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगानेही दखल घेतली आहे. आयोगाने पोलिसांकडून आतापर्यंत तपासासंबंधित संपूर्ण रिपोर्ट मागितला आहे.

आणखी वाचा : 

बदलापूर अत्याचार प्रकरणी संतापाची लाट, 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक

बदलापूर प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले...