Swati Maliwal Case : स्वाती मालिवाल यांच्यावर रात्री उशिरापर्यंत वैद्यकीच चाचणी, वाचा प्रकरणातील आतापर्यंतची टाइमलाइन

| Published : May 17 2024, 08:08 AM IST

Swati Maliwal ‘assault’ case
Swati Maliwal Case : स्वाती मालिवाल यांच्यावर रात्री उशिरापर्यंत वैद्यकीच चाचणी, वाचा प्रकरणातील आतापर्यंतची टाइमलाइन
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पीए विरोधात आप नेत्या स्वाती मालिवाल यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. स्वाती मालिवाल यांना मारहाण झाल्याचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात आतापर्यंत काय-काय झाले याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

Swati Maliwal Case : आम आदमी पार्टीच्या (AAP) राज्यसभेतील खासदार स्वाती मालिवाल यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्यासोबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्या पीएने मुख्यमंत्री निवासस्थानी मारहाण आणि गैरवर्तन केल्याचा आरोप लावला होता. याच संदर्भात आता स्वाती मालिवाल यांनी दिल्ली पोलिसात धाव घेत लेखी तक्रार दाखल केली आहे. यानंतर दिल्ली पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांचा पीए विभव कुमार (Vibhav Kumar) याच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

स्वाती मालिवाल यांनी तक्रारीत काय म्हटलेय?
दिल्ली पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीत स्वाती मालिवाल यांनी म्हटले की, कशाप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गैरवर्तवणूक करण्यात आली. इंडिया टुडे आणि आज तकच्या रिपोर्ट्सनुसार, स्वाती मालिवाल यांनी म्हटले की विभव यांनी मला मारहाण केली.

इंडिया टीव्हीच्या रिपोर्ट्सनुसार, विभवने कारण नसतानाही मारहाण केली. यावेळी आरडाओरडा करुनही विभव कुमारने शिवीगाळ करण्यासह मारहणा करणे सुरुच ठेवले. एफआयआरनुसार, स्वाती मालिवाल यांना मारहाण झाली त्यावेळी त्या मासिक पाळीतून जात होत्या.

वैद्यकीय चाचणी करण्यासाठी रुग्णालयात दाखल
स्वाती मालिवाल यांनी केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी विभव कुमारच्या विरोधात आयपीसी कलम 354, 556, 509 आणि 323 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या बाजूला स्वाती मालिवाल यांनी विभववर केलेल्या आरोपानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यासाठी स्वाती मालिवाल एम्स रुग्णालयात आल्या होत्या.

राष्ट्रीय महिला आयोगाने उचलले मोठे पाऊल
स्वाती मालिवाल यांना झालेल्या मारहाणीसह गैरवर्तवणूक प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने विभव कुमारला हजर होण्यास सांगितले आहे. महिला आयोगाने विभवला सकाळी 11 वाजता आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. दुसऱ्या बाजूला भाजपाकडून सातत्याने अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला जात आहे. याशिवाय अरविंद केजरीवाल यांनी स्वाती मालिवाल यांच्यासोबत घडलेल्या प्रकारावर मौन धरल्यानेही भाजपाने निशाणा साधला आहे.

आणखी वाचा : 

CAA अंतर्गत 14 जणांना मिळाले भारतीय नागरिकत्व, केंद्रीय गृह सचिवांनी दिली प्रमाणपत्रे

'राम मंदिरानंतर आता माता सीतेचे भव्य मंदिर उभारणार', अमित शाह यांचे आश्वासन