सार

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शनिवारी (16 मार्च) तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे देशभरात आदर्श आचार संहिता लागू होणार आहे. अशातच  महाराष्ट्रात यंदा लोकसभेच्या निवडणुका पाच टप्प्यात होणार आहेत. 

Maharashtra Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाने शनिवारी (16 मार्च) अखेर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. देशात लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडणार आहेत. पण महाराष्ट्रातील निवडणुका पाच टप्प्यात होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेवेळी केली आहे. या मतदानाचे निकाल 4 जून रोजी समोर येणार आहेत. 

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. वर्ष 2019 मध्ये राज्यात भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीने निवडणूक लढवली होती. त्यावेळी एनडीच्या हाती 41 जागा आल्या होता. 23 जागांवर भाजप आणि 18 जागांवर शिवसेनेला विजय मिळाला होता. याशिवाय चार जागांवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, एका जागेवर काँग्रेस, एक जागा असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाला मिळाली होती. याशिवाय अमरावती येथून अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या नवनीत राणा यांचा देखील विजय झाला होता.

राज्यातील 48 लोकसभा जागांवर पाच टप्प्यात मतदान

  • पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल, 2024

रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

  • दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल, 2024

बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

  • तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे, 2024

रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

  • चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे, 2024

नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

  • पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे, 2024

धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे,मुंबई, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण,

YouTube video player

वर्ष 2019 मध्ये महाराष्ट्रात चार टप्प्यात झाले होती निवडणूक
महाराष्ट्रात वर्ष 2019 मध्ये चार टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्यात आली होती. लोकसभेच्या 48 जागांवर निवडणूक लढवण्यात आली होती. पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल, दुसरा टप्पा 18 एप्रिल, तिसरा टप्पा 23 एप्रिल आणि चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल रोजी झाले होते. या मतदानाचे निकाल 23 मे रोजी जाहीर करण्यात आले होते.

पहिल्या टप्प्यात या जागांसाठी झाले होते मदतान
पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल, 2019 रोजी महाराष्ट्रातील सात लोकसभेच्या जागांवर मतदान झाले होते. यामध्ये वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम लोकसभेच्या जागांचा समावेश होता.

दुसऱ्या टप्प्यातील मतदान
दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 एप्रिलला 10 जागांसाठी झाले होते. यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापुर लोकसभेच्या जागांचा समावेश होता.

तिसऱ्या टप्प्यातील मतदान
महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेसाठी मतदान 14 जागांसाठी 23 एप्रिल रोजी झाले होते. यामध्ये जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले येथून झाले होते.

अखेरच्या टप्प्यातील मतदान
राज्यात अखेरच्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला 17 जागांसाठी झाले होते. यामध्ये नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरूर आणि शिर्डी येथे झाले होते.

आणखी वाचा : 

सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांच्या गटाला सुनावले, शरद पवारांचा फोटो आणि नाव वापरण्यास केली मनाई

Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्रात NDA मधील पक्षांमध्ये सीट शेअरिंगचा फॉर्म्युला ठरला, जाणून घ्या कोणत्या चेहऱ्यांना मिळणार संधी

PM Modi Maharashtra Visit : PM मोदींच्या हस्ते 9 कोटी शेतकरी कुटुंबांना 21 हजार कोटी रुपयांचे वितरण