PM Modi Maharashtra Visit : PM मोदींच्या हस्ते 9 कोटी शेतकरी कुटुंबांना 21 हजार कोटी रुपयांचे वितरण

| Published : Feb 28 2024, 01:58 PM IST / Updated: Feb 28 2024, 02:24 PM IST

pm modi

सार

PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यादरम्यान विविध प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. जाणून घ्या सविस्तर माहिती….

PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र राज्याचा दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी विविध प्रकल्प आणि योजनांचा शुभारंभ तसेच लोकार्पणही करणार आहेत. संध्याकाळी ते महाराष्ट्रात दाखल होतील.

कोणकोणत्या प्रकल्पांचे होणार लोकार्पण, जाणून घ्या सविस्तर…

  • पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत देशातील 9 कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण 21,000 कोटी रुपयांची मदत
  • महाराष्ट्रातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना सुमारे 6900 कोटी रुपयांचे वितरण
  • राज्यातील सुमारे 5000 कोटी रुपयांच्या रस्ते, रेल्वे आणि सिंचन प्रकल्पांचे उद्घाटन / भूमिपूजन

वरोरा- वणी महामार्गावरील 18 कि.मी. चौपदरीकरण कामाचे लोकार्पण

- चंद्रपूर- जिल्ह्यातील घुग्गुस, वणी, तडाळी, पडोळी यांसारख्या विविध औद्योगिक क्षेत्रांना फायदेशीर

सलाईखुर्द - तिरोरा महामार्गावरील 42 कि.मी. काँक्रिटीकरण रस्त्याचे लोकार्पण -379 कोटी रुपये

- नागजिटा अभयारण्याच्या पर्यटनाला चालना

- गोदिंया ते नागपूर प्रवासाच्या वेळेत एक तासाची कपात

साकोली- भंडारा जिल्हा सीमेपर्यंतच्या 55.80 कि.मी. दुपदरी रस्त्याचे लोकार्पण (291 कोटी रुपये)

- या भागातील उद्योगांना फायदा

- वेळ आणि इंधनाची बचत होईल 

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील 6 प्रकल्पांचे लोकार्पण (1683 कोटी रुपये)

- आतापर्यंत पूर्ण झालेल्या प्रकल्पातून 2.41 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण

- विदर्भ आणि मराठवाडा प्रदेशातील एकूण 11 प्रकल्पांचा समावेश

बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील 45 सिंचन प्रकल्पांचे लोकार्पण (1180 कोटी रुपये)

- आतापर्यंत पूर्ण झालेल्या प्रकल्पातून 51 हजार हेक्टरची सिंचन क्षमता 

- फक्त महाराष्ट्रात ही योजना राबवण्यात येत आहे

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील न्यू आष्टी - अंमळनेर (32.84 कि.मी) टप्प्याचे लोकार्पण (645 कोटी रुपये) व अंमळनेर न्यू आष्टी स्टेशनपर्यंत विस्तारित रेल्वे सेवेचा शुभारंभ

- बीड जिल्ह्यातील नागरिक व कामगार वर्गाला लाभदायक

- आष्टी हे देशातील इतर भागाशी रेल्वे सेवेने जोडले जातील

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गावटील वर्धा - कळंब (जि. यवतमाळ) या टप्प्याचे (39 कि.मी.) लोकार्पण (675 कोटी रुपये) व नवीन रेल्वे गाडीचा शुभारंभ

- वर्षा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील दळणवळण गतिशील होणार

- यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच ब्रॉडगेज रेल्वे सेवा

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत 5.50 लाख महिला बचत गटांना 825 कोटी फिरत्या निधीचे वितरण

- स्वयसहाय्यता समूहांना अतिरिक्त खेळते भांडवल देण्यासाठी 913 कोटी रुपयांची विशेष तरतूद

इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी मोदी आवास योजनेचा शुभारंभ

- येत्या 3 वर्षांत 10 लाख घरे बांधणार

- 2.5 लाख लाभार्थ्यांना 375 रुपये कोटीच्या पहिल्या हप्त्याचे ऑनलाइन वितरण

आयुष्मान भारत अंतर्गत महाराष्ट्रात एक कोटी आयुष्मान कार्डचे वितरण

- गरिबांसाठी वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार 

- चाचणी, उपचार आणि औषधे मोफत

पीएम किसान सन्मान निधीच्या 16व्या हप्त्याचे थेट बँक खात्यात वितरण

- देशातील 9 कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण 21 हजार कोटी रुपयांचे वितरण

- राज्यातील सुमारे 88 लाख शेतकरी कुटुंबांना 1969 कोटी रुपयांचे वितरण

- आधार लिंक बँक खात्यात लाभांचे डिजिटल हस्तांतरण

यवतमाळ येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण

नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे वितरण

- राज्यातील सुमारे 88 लाख शेतकरी कुटुंबांना 3800 कोटी रुपयांचा लाभ 

- आधार लिंक बँक खात्यात लाभांचे डिजिटल हस्तांतरण

आणखी वाचा

PM Modi Tamil Nadu Visit : 'येथील मीडियाला प्रकल्पांबद्दल सांगायचंय, पण...' PM मोदींचा स्टॅलिन सरकारवर हल्लाबोल

'रुग्णालयांसाठी उपचार खर्चाचे किमान दर ठरवावेत, खासगी रुग्णालयांची मनमानी चालणार नाही', सुप्रीम कोर्टाचे सरकारला आदेश 

'पैसा आणि ताकदीच्या जोरावर BJP कडून सत्ता पाडली जाऊ शकते', हिमाचलमधील राजकीय संकटावर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया