सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांच्या गटाला सुनावले, शरद पवारांचा फोटो आणि नाव वापरण्यास केली मनाई

| Published : Mar 14 2024, 02:33 PM IST / Updated: Mar 14 2024, 02:35 PM IST

Supreme Court

सार

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवारांना दिले. याबद्दल शरद पवारांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Supreme Court to Ajit Pawar Group : सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार (Sharad Pawar) यांचा फोटो वापरण्यासंदर्भात अजित पवारांच्या (Ajit Pawar) गटाला सुनावले आहे. कोर्टाने अजित पवारांच्या गटाकडून तयार करण्यात आलेल्या पोस्टवर शरद पवार यांचा फोटो वापरल्याने नाराजी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले की, अजित पवारांच्या गटाने शरद पवारांचा नाव का वापरत आहे? ज्यावेळी निवडणुका येतात तेव्हा तुम्हाला शरद पवारांची का गरज भासते. याशिवाय निवडणूक नसेल तेव्हा तुम्ही शरद पवारांना विसरता. तुमची एक वेगळी आता ओखळ निर्माण झाली असून त्यानुसारच पुढे जा.

सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले की, अजित पवारांच्या गटाने शरद पवारांचा फोटो वापरणार नाहीत असे लेखी रुपात न्यायालयासमोर सादर करावे. या प्रकरणावर आता पुढील सुनावणी येत्या 18 मार्चला होणार आहे.

कोर्टाने प्रतिज्ञापत्र मागवले
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवेळी न्यायाधीश सूर्यकांत यांनी अजित पवारांच्या गटाने त्यांच्या कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवावे असे म्हटले आहे. तुमची एक वेगळी ओखळ आहे तर तुम्ही शरद पवारांचे नाव आणि फोटो वापरू नये. याशिवाय तुम्ही वेगवेगळ्या वृत्तपत्रांना देखील तुमची आता एक वेगळी ओखळ आहे अशा सूचना देण्यास सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांच्या गटाला सांगितले आहे.

दरम्यान, अजित पवारांचे वकील मनिंदर सिंह यांनी म्हटले शरद पवारांचा फोटो वापरलेले पोस्टर जुने असू शकते. सोशल मीडियावर कोणताही व्यक्ती काहीही पोस्ट करू शकतो. आम्ही त्यावर अंकुश कसे ठेवणार? यावर सर्वोच्च न्यायालयाने उत्तर देत म्हटले की, तुम्ही एक सार्वजनिक नोटीस जारी करून याबद्दल सांगावे.

दुसऱ्या बाजूला जेष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटले की, शरद पवारांचे नाव आणि फोटोचा वापर अजित पवारांच्या गटाने करू नये. भविष्यात असे होता कामा नये. अजित पवारांच्या गटाने स्वबळावर मत मिळवावीत.

आणखी वाचा : 

Former President Pratibha Patil : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे निमंत्रण नाकारले, वाचा नक्की काय आहे कारण

धक्कादायक ! मंत्रालयातून जारी केल्या जाणाऱ्या शासकीय कागदपत्रांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी आणि शिक्के, पोलिसात तक्रार दाखल